Connect with us

गोवा खबर

सुरक्षित रुग्णसेवेसाठी क्लिनिकल कौशल्ये अधिक सक्षम करण्याची गरज” : विश्वजीत राणे

Published

on

Spread the love

गोवा खबर : ट्रेन्ड नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया (TNAI), गोवा राज्य शाखेतर्फे आयोजित “नर्सिंग कन्व्हर्जन्स 4.0” कार्यक्रमाचे उद्घाटन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या हस्ते करण्यात आले. “Advancing Clinical Competencies for Safer Patient Care” ही या परिषदेमागील मुख्य संकल्पना असून, सुरक्षित आणि अधिक सक्षम आरोग्य सेवा देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे राणे यांनी सांगितले.

विश्वजीत राणे म्हणाले की, गोव्याचा आरोग्य क्षेत्रातील विकास हा देशासाठी आदर्श ठरू शकतो आणि त्यासाठी नर्सिंग क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. रुग्णसेवा अधिक प्रभावी आणि सुरक्षित करण्यासाठी आधुनिक क्लिनिकल कौशल्ये आणि सातत्यपूर्ण प्रशिक्षण आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

ते पुढे म्हणाले की, गोव्याची नर्सिंग क्षेत्रातील कर्मचारीवर्ग हा राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचा खरा कणा आहे. नर्सेसची मेहनत, संवेदनशीलता आणि प्रत्येक रुग्णाबद्दलची समर्पित सेवा ही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. समाजासाठी नर्सिंग क्षेत्र करत असलेल्या कार्याचा अभिमान असल्याचेही त्यांनी यावेळी व्यक्त केले.