Connect with us

गोवा खबर

गोवा पोलिसांकडून १२० हरवलेले मोबाईल मूळ मालकांना परत

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा पोलिसांनी तांत्रिक तपासाचा वापर करून शोधून काढलेले १२० हरवलेले मोबाईल फोन त्यांच्या मालकांना सन्मानपूर्वक परत केले आहेत.

पणजी येथील पोलीस मुख्यालयात आयोजित एका कार्यक्रमात पोलीस महानिरीक्षक के. आर. चौरसिया यांच्या हस्ते हे फोन सुपूर्द करण्यात आले.

केंद्र सरकारच्या पोर्टलचा प्रभावी वापर करून हे यश मिळवल्याचे पोलिसांनी सांगितले, ज्यामुळे नागरिकांनी पोलीस दलाचे आभार मानले आहेत.