Connect with us

गोवा खबर

भाजपच्या राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यशाळेत गोवा नेत्यांचा सहभाग; संघटनात्मक बांधणी आणि विचारधारेवर भर

Published

on

Spread the love

गोवा खबर : भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) गोवा प्रदेश शाखेच्या नेत्यांनी नुकतीच इंदूर येथे आयोजित ‘राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यशाळेत’ सहभाग नोंदवला. ही कार्यशाळा जगातील सर्वात मोठ्या राजकीय प्रशिक्षण उपक्रमांपैकी एक असून, यामध्ये गोव्यातील वरिष्ठ नेत्यांनी उपस्थिती लावली होती.

प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळात खासदार सदानंद शेट तानावडे, प्रदेश उपाध्यक्ष नरेंद्र सवाईकर, तसेच ज्येष्ठ नेते सिद्धार्थ कुंकळ्येकर, सरवनंद भगत, रुपेश कामत, सुलक्षणा सावंत आदींचा समावेश होता. या शिबिरात पक्षाची विचारधारा, कार्यपद्धती आणि संघटनात्मक विस्ताराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेनंतर आता गोवा भाजपतर्फे राज्यभरात जिल्हा आणि मंडळ स्तरावर कार्यकर्त्यांसाठी विशेष प्रशिक्षण सत्रे आयोजित केली जाणार आहेत. या प्रयत्नांमुळे तळागाळातील संघटना अधिक मजबूत होईल आणि कार्यकर्त्यांमधील समन्वय वाढेल, अशी खात्री पक्ष नेतृत्वाने व्यक्त केली आहे.