Connect with us

गोवा खबर

सत्तरीच्या विकासासाठी आणि रोजगारासाठी आग्रही; मुख्यमंत्री सावंत यांच्यासोबत राहूनच तरुणांच्या हक्कांसाठी लढणार : मंत्री राणे

Published

on

Spread the love

गोवा खबर : ‘मी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासोबत आहे आणि यापुढेही राहीन, मात्र सत्तरीतील तरुणांना रोजगार मिळवून देणे हे माझे कर्तव्य आहे,’ अशा शब्दांत आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. होंडा येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

होंडा येथील मैदानाचे उद्घाटन आणि विविध विकासकामांच्या शुभारंभ प्रसंगी राणे यांनी सत्तरीच्या रोजगाराचा प्रश्न लावून धरला. सरकार गरिबांच्या कल्याणासाठी चांगले काम करत असल्याचे नमूद करूनही, त्यांनी स्थानिक तरुणांच्या नोकऱ्यांच्या मागणीवर ठाम असल्याचे दाखवून दिले.

“सत्तरीतील सुशिक्षित युवकांना सरकारी नोकरीत संधी मिळाली तरच त्यांचा विकास होईल. माझं हे म्हणणं सरकारपर्यंत पोहोचवणारच,” अशी ग्वाही त्यांनी दिली. या कार्यक्रमाला आमदार डॉ. दिव्या राणे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. या भागात उभारल्या जाणाऱ्या मार्केट प्रकल्पाची पायाभरणी आणि भविष्यातील विकासाच्या योजनांबाबतही त्यांनी माहिती दिली.