Connect with us

गोवा खबर

निवडणूक आयोगाला चपराक; पणजी मनपा निवडणुकीविरोधात उत्पल पर्रीकरांची न्यायालयात धाव

Published

on

Spread the love

गोवा खबर : पणजी महानगरपालिका निवडणुकीत ‘मत गुप्तता’ पाळली गेली नसल्याचा गंभीर आरोप करत उत्पल पर्रीकर यांनी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मतपत्रिकेवर नाव आणि क्रमांक टाकून मतदारांच्या गुप्ततेचा भंग केल्याचा दावा त्यांनी केला आहे.

फोंडा पोटनिवडणूक रद्द करण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे निवडणूक आयोगासाठी मोठी चपराक असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्य निवडणूक आयोग आणि मनपा आयुक्तांना या प्रकरणी प्रतिवादी करण्यात आले आहे. “निवडणूक आयोगाला कायद्याचे ज्ञान नाही, हे धक्कादायक आहे,” असे म्हणत त्यांनी आगामी निवडणुका पारदर्शकपणे घेण्याची मागणी केली आहे.