Connect with us

गोवा खबर

आयुष मंत्रालयाकडून लोणारमध्ये ‘योग महोत्सव–2026’ सह आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 ची 75-दिवसीय उलटगणना सुरू

Published

on

Spread the love

गोवा खबर : आयुष मंत्रालयाच्या मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेने आज महाराष्ट्रात बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार इथल्या छत्रपती  शिवाजी महाराज उद्यान इथे ‘योग महोत्सव–2026’ चे आयोजन केले. या कार्यक्रमाने त्रिकोणासन करणाऱ्या सर्वात मोठ्या समुदायासाठी ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये स्थान मिळवून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला.

पहाटे सुमारे 5,000 सहभागींनी एकत्र येऊन सामान्य योग शिष्टाचार  (सीवायपी) सादर केला, त्यामुळे ऐतिहासिक लोणार शहराचे रूपांतर सामूहिक कल्याणाच्या एका चैतन्यमय केंद्रात झाले. यावेळी  मोठ्या संख्‍येने योगप्रेमी  सहभागी झाल्यामुळे  एकता, आरोग्य आणि कल्याणाला चालना देण्यासाठी एक शक्तिशाली माध्यम म्हणून योगची वाढती जागतिक स्वीकृती अधोरेखित केली.

आयुष मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी या कार्यक्रमाचे वर्णन “आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 च्या 75-दिवसीय उलटगणनेची एक सशक्त सुरुवात” असे केले. भूवैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाच्या लोणार भागात हा उत्सव आयोजित करणे,  हे सर्वांगीण आरोग्य आणि सुसंवादाविषयीच्या व्यापक जागतिक जागृतीचे प्रतीक आहे, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी त्यांनी ‘आयुष आहारा’चे महत्त्व देखील अधोरेखित केले. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि सर्वांगीण आरोग्याला चालना देण्यासाठी भरड धान्ये, नाचणी, खोबरेल तेल आणि औषधी मसाल्यांसारख्या पारंपरिक आणि नैसर्गिक अन्नाच्या महत्वावर त्यांनी भर दिला.

उपस्थितांना संबोधित करताना आयुष मंत्रालयाच्या संयुक्त सचिव मोनालीसा दास यांनी योग म्हणजे,  जगाला लाभलेली भारताची सर्वात मौल्यवान देणगी असे केले. योग ही एक जीवनपद्धती असून ती मन, शरीर आणि आत्मा यांच्यात सुसंवाद निर्माण करते, असे त्यांनी सांगितले.

‘योग महोत्सव–2026’ मध्ये आयुष मंत्रालयाच्या अनेक प्रमुख उपक्रमांचे प्रदर्शन करण्यात आले. यामध्ये ‘विमान प्रवासासाठी योग शिष्‍टाचार , ‘संसर्गजन्य नसलेल्या आजारांसाठी 10 योग प्रोटोकॉल’ आणि दैनंदिन जीवनात योगचा समावेश करण्याच्या उद्देशाने ‘योग 365’ मोहिमेचा समावेश होता. तसेच 14 दिवसांचे मोफत मार्गदर्शित योग सराव उपलब्ध करून देणाऱ्या टोल-फ्री हेल्पलाइन (1800-315-7008) बद्दलही माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमाने 12 व्या आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 च्या 75-दिवसीय उलटगणनेची औपचारिक सुरुवात केली.