Connect with us

गोवा खबर

राज्यातील ६ नगरपालिकांवर प्रशासकांची नियुक्ती; प्रभाग पुनर्रचनेचे काम युद्धपातळीवर

Published

on

Spread the love

गोवा खबर : राज्यातील मुदत संपलेल्या सहा नगरपालिकांवर अखेर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात डिचोली, कुडचडे-काकोडा, काणकोण, पेडणे, कुंकळ्ळी आणि वाळपई या नगरपालिकांचा समावेश आहे. प्रभाग पुनर्रचनेचे काम सुरू असल्यामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या असून, मे महिन्याच्या अखेरीस मतदान होण्याची शक्यता आहे.

  • कोणाकडे कोणती जबाबदारी?
  • डिचोली: अक्षय पोतेकर (संचालक, पोलीस महासंचालक कार्यालय)
  • कुडचडे-काकोडा : सागर गावडे (व्यवस्थापकीय संचालक, गोवा शिक्षण विकास महामंडळ)
  • काणकोण : शंकर गावकर (सदस्य सचिव, कला अकादमी)
  • पेडणे : श्रीकांत पेडणेकर (सहाय्यक अबकारी आयुक्त)
  • कुंकळ्ळी : विकास कांबळे (मुख्य कार्यकारी अधिकारी, दक्षिण गोवा जिल्हा पंचायत)
  • वाळपई : राजू देसाई (वन सेटलमेंट अधिकारी)
    राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचा मसुदा प्रसिद्ध केला असून, नागरिकांना ७ एप्रिलपर्यंत हरकती व सूचना मांडता येणार आहेत.