Connect with us

गोवा खबर

८ मार्च रोजी महिलांसाठी खास आरोग्य तपासणी शिबिरे

Published

on

Spread the love

गोवा खबर : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांच्या नेतृत्वाखाली, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, रविवार, ८ मार्च रोजी राज्यातील सर्व सरकारी आयुष्मान आरोग्य मंदिर-प्राथमिक आरोग्य केंद्रे, आणि सरकारी रुग्णालयांमध्ये महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. या शिबिरांमध्ये महिलांसाठी समर्पित काउंटर असतील.

राज्यातील महिलांच्या आरोग्यावर आणि कल्याणावर विशेष भर देण्यासाठी ही शिबिरे आयोजित केली आहेत. हे शिबिर “चेक्ड बाय डॉटर” या शीर्षकाखाली सुरू  होईल. आरोग्य सेवा संचालनालय, गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि गोवा दंत महाविद्यालयाच्या अंतर्गत येणारे सर्व विभाग या उपक्रमाचा भाग असतील.

लोकांनी जवळच्या सरकारी आरोग्य केंद्रात जाऊन या शिबिराचा लाभ घ्यावा अशी विनंती आहे.