Connect with us

गोवा खबर

पणजी येथे 18 रोजी 65 व्या प्रादेशिक डाक अदालतचे आयोजन

Published

on

Spread the love

गोवा खबर : टपाल विभाग 18 मार्च  2026 रोजी सकाळी 11 वाजता पणजी येथील पोस्टमास्टर जनरल यांच्या कार्यालयात गोवा प्रदेशासाठी 65 व्या  प्रादेशिक स्तरावरील डाक अदालतचे आयोजन करणार आहे.

डाक अदालतमध्ये  गोवा राज्य आणि महाराष्ट्रातील  सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा या पाच टपाल विभागांचा समावेश असलेल्या  गोवा प्रदेशातील टपाल सेवा, स्पीड पोस्ट, काउंटर सेवा, बचत बँक खाती आणि मनी ऑर्डरशी संबंधित तक्रारींचा विचार केला जाईल.

संबंधित टपाल अधिकाऱ्यांकडे तक्रार  दाखल केल्यानंतर सहा आठवड्यांपेक्षा जास्त काळ ज्या तक्रारींचे निराकरण झाले नाही, अशा तक्रारी या डाक अदालतमध्ये  विचारात घेतल्या जातील. तक्रारदारांनी त्यांच्या पूर्वीच्या तक्रारीची संपूर्ण माहिती, ज्यामध्ये सुरुवातीला तक्रार ज्या अधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती त्यांची नावे आणि पदनाम यासारख्या बाबींचा तपशील  नमूद केलेला असावा.

इच्छुक ग्राहक त्यांच्या तक्रारी दोन प्रतींमध्ये  सहाय्यक टपाल सेवा संचालक-I, पोस्टमास्टर जनरल कार्यालय, गोवा प्रदेश, पणजी – 403001 येथे सादर करू शकतात. तक्रारी दाखल  करण्याची शेवटची तारीख 12, मार्च 2026 आहे.

टपाल विभाग ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी वेळोवेळी डाक अदालत आयोजित करत असतो , जिथे वरिष्ठ टपाल अधिकारी ग्राहकांशी थेट संवाद साधतात, त्यांच्या तक्रारींचा आढावा घेतात आणि त्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी प्रयत्न करतात.