गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. लोकांच्या हृदयात आणि मनात कायमचे स्थान मिळविणाऱ्या अत्यंत प्रभावशाली नेता आणि एक उत्कृष्ट प्रशासक म्हणून पंतप्रधानांनी त्यांचे स्मरण केले आहे.
महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय आणि समावेशक विकासावर संपूर्ण लक्ष केंद्रीत करत कल्याणकारी प्रशासन समर्थपणे चालवत तामिळनाडूच्या मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या परिवर्तनकारी कारकिर्दीवर मोदी यांनी प्रकाश टाकला.
पंतप्रधानांनी त्यांच्यासोबत झालेल्या संतोषजनक संवादाचे स्मरण केले. या महिन्याच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात मोदींनी त्यांच्या जीवनाबद्दल आणि कार्याबद्दल व्यक्त केलेले विशिष्ट विचार यावेळी सामायिक केले आहेत.