गोवा खबर : राज्याला ऊर्जा स्वयंपूर्ण बनवण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत ‘ऊर्जा स्वयंपूर्ण गोवा’ उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते या जनजागृती कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
सौरऊर्जा, अक्षय ऊर्जा स्रोतांचा अधिकाधिक वापर करून गोव्याला दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षितता मिळवून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, घराघरांवर सौरऊर्जा प्रकल्प बसवणे, ग्रामपातळीवर ऊर्जा निर्मिती वाढवणे आणि पर्यावरणपूरक विकास साधणे हे सरकारचे ध्येय आहे.