Connect with us

गोवा खबर

शेतकरी वर्गाकडून सुकूरमध्ये, भाजपाच्या अस्नोडकरना पाठींबा

Published

on

Spread the love
गोवा खबर: सुकूर जिल्हा पंचायत निव़डणुकीसाठी मतदारसंघातील शेतकरी वर्गाने भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अमित देविदास अस्नोडकर यांना आपला पाठींबा दर्शविला आहे. 
अलीकडेच सुकूर जिल्हा पंचायत मतदारसंघातील शेतकरी वर्गाची एक बैठक पर्वरीचे आमदार तथा पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या पर्वरी येथील आमदार कार्यालयात घेण्यात आली. त्यात साळगांवचे आमदार केदार नाईक, सरपंच सोनिया पेडणेकर व पंचसदस्य हे देखील उपस्थित होते.
शेतकरी वर्गासाठी सरकारच्या विविध योजना सर्वसामान्यापर्यंत पोचविण्याचे काम सातत्याने करत आलो असून हे काम अधिक जोमाने व्हायचे असल्यास समविचारी लोकप्रतिनिधी विविध स्तरावर निवडून आणणे गरजेचे असल्याचे मत मंत्री खंवटे यांनी व्यक्त केले.
भाजपा सरकारने शेतकरी वर्गाच्या हितासाठी सदैव प्राधान्य देताना कृषी व्यवसायाला नव संजीवनी दिल्याचे खंवटे यांनी स्पष्ट केले. आपल्या मतांचे आशीर्वाद भाजपाच्या पारड्यात टाकून बळीराजाच्या कल्याणासाठी काम करण्याचे बळ द्या असे आवाहनही त्यांनी केले.
सामान्यांच्या हितासाठी काम करण्यासाठी आमदार नाईक यांनी भाजपा सरकारचे हात बळकट करण्याचे आवाहन उपस्थित शेतकरी मित्रांना केले. आजवर जशी साथ दिलीत तीच आताही द्या असे कळकळीचे आवाहनही त्यांनी करून अमित अस्नोडकर यांनी विजयी करण्याचे आवाहन केले.