सामाईक लोकशाही आदर्श आणि जागतिक शांततेप्रती असलेल्या वचनबद्धतेची पुष्टी
गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे त्यांनी दिलेल्या दिवाळीच्या शुभेच्छांसाठी तसेच दीपोत्सवानिमित्त दूरध्वनीवरून साधलेल्या संपर्कासाठी आभार व्यक्त केले.
पंतप्रधानांनी भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान असलेल्या शाश्वत भागीदारीच्या ताकदीवर भर दिला आणि दहशतवादाचा मुकाबला करणे आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना देणे यासाठी असलेल्या भारताच्या अढळ वचनबद्धतेचा पुनरूच्चार केला.
एक्स या समाजमाध्यमांवरील संदेशात पंतप्रधान मोदी म्हणालेः राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, आपल्या दूरध्वनीबद्दल आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छांबद्दल धन्यवाद. दिव्यांच्या या सणानिमित्त, आपली दोन महान लोकशाही जगाला आशेचा किरण देत प्रकाशित करत राहू आणि दहशतवादाविरोधात एकजूट होऊन उभे राहू.”