Connect with us

गोवा खबर

रामा काणकोणकरांच्या प्रकृतीसाठी आमदार व मंत्र्यांची धावपळ

Published

on

Spread the love

गोवा खबर : सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आमदार आणि मंत्र्यांचा ओघ सुरू आहे. कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली आणि लवकर बरे व्हा, पुन्हा जोमाने समाजकार्यात रुजू व्हा, अशी शुभेच्छा दिली.

लोबो म्हणाले, काणकोणकर यांनी गोव्यासाठी आयुष्यभर निःस्वार्थी काम केले असून त्यांच्या या कठीण प्रसंगी आपण त्यांच्यासोबत आहोत. पूर्णपणे बरे झाल्यावर त्यांच्या निवासस्थानी भेट देण्याचेही आश्वासन त्यांनी दिले.

दरम्यान, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी वैद्यकीय अधीक्षकांना आवश्यक ती सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या असून “काणकोणकर यांच्या उपचारात कोणतीही उणीव राहणार नाही,” असे आश्वासन दिले. त्यांनी स्वतः त्यांच्या आरोग्य स्थितीवर लक्ष ठेवत असल्याचे सांगितले.

याच पार्श्वभूमीवर, काणकोणकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत जेनिटो कार्दोजने चौकशीत कबुली दिल्यानंतर न्यायालयात मात्र उलट भूमिका घेतली. “हा हल्ला माझ्याशी काही संबंध नसून पोलिसांनी मला विनाकारण फसवले,” असा दावा त्याने केला. या प्रकरणावरून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ माजली आहे.