गोवा खबर : कुरतडकर नगरी, फोंडा येथील किड्स नेस्ट स्कूल सभागृह येथे शनिवार, २८ जून या दिवशी सायंकाळी ६ वाजता ‘छत्रपती संभाजी महाराज आणि मर्दनगडाचा इतिहास’ या विषयावर प्रसिद्ध इतिहासकार सचिन मदगे यांचे मार्गदर्शन होणार आहे.

गोव्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी केलेले कार्य विसरता येणार नाही; मात्र आज त्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी बांधलेला फोंडा येथील एकमेव मर्दनगड दुर्लक्षित अवस्थेत आहे. या ऐतिहासिक मर्दनगडाचे संवर्धन होणे आवश्यक आहे. त्यामुळे या गडाचा इतिहास सर्वांना समजावा यासाठी समस्त शिवप्रेमी आणि धर्माभिमानी नागरिक यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक मर्दनगड संवर्धन समितीने केले आहे.