गोवा खबर : भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने “२०२४ च्या तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कारासाठी नामांकने मागविली आहेत. साहस क्षेत्रातील व्यक्तींच्या कामगिरीची दखल घेऊन हा पुरस्कार दिला जातो. जमिनीवरील साहस, पाणी (समुद्र) आणि हवाई साहस यावरील साहसी उपक्रमांसाठी प्रत्येकी एक पुरस्कार प्रदान केला जातो. याव्यतिरिक्त, साहस क्षेत्रातील “जीवनगौरव” साठी एक पुरस्कार प्रदान करण्याची तरतूदही करण्यात आली आहे.
इच्छुक उमेदवारांनी मागील तीन वर्षात म्हणजेच २०२२, २०२३ आणि २०२४ मध्ये जमीन, हवाई किंवा समुद्र अशा साहसी क्षेत्रात सतत कामगिरी केली आहे ते या पुरस्कारासाठी अर्ज करू शकतात. उमेदवार क्रीडा आणि युवा व्यवहार खात्याकडून शिफारस घेतल्यानंतर २६ जून २०२५ पर्यंत ( https://awards.gov.in ) या पोर्टल द्वारे त्यांचे अर्ज अपलोड करू शकतात.
संबंधित नियम आणि कायदे आणि अर्जाचा नमुना क्रीडा आणि व्यवहार संचालनालयाच्या अधिकृत वेबसाइट www.dsya.goa.gov.in वर अपलोड करण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी एपीईओ श्रीमती पर्पेचुआ सिंथ्यिया सिक्वेरा यांच्याशी मोबाईल क्रमांक ९८२३३९३६५७ वर संपर्क साधावा.