गोवा खबर : राज्यात अनधिकृत सेवा दिल्या प्रकरणात तातडीने कारवाई करत, गोव्यातील पर्यटन पोलिस युनिटने बागा समुद्रकिनाऱ्यावरील एका व्यक्तीला आवश्यक परवानगीशिवाय पर्यटकांना सेवा दिल्याबद्दल अटक केली आहे.
ही घटना नियमित गस्त घालत असताना घडली, जेव्हा पर्यटन खात्याच्या वॉर्डनने पर्यटक पोलिस युनिटच्या कर्मचाऱ्यांसह, गोवा पर्यटक व्यापार नोंदणी कायदा, १९८२चे उल्लंघन करून सेवा देणारी एक व्यक्ती सापडली. चौकशी केल्यानंतर, त्या व्यक्तीने स्वतःची ओळख मेघनाथ दास (२५) असे करून दिली. ही व्यक्ती लक्ष्मण बार अँड रेस्टॉरंट, बागा बार्देझ येथे राहते. या व्यक्तीकडे, सेवा देण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांकडून आवश्यक असलेली परवानगी नसल्याची पुष्टी झाली आहे.

कायद्याच्या कलम २६ अंतर्गत पुढील आवश्यक कारवाईसाठी, सदर व्यक्तीला पर्यटन खात्यासमोर हजर करण्यात आले आहे. पर्यटकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि राज्यात जबाबदार व नियंत्रित पर्यटन नियम राखण्यासाठी पर्यटन खाते वचनबद्ध आहे.