Connect with us

गोवा खबर

पुनाजी गावस यांना मिळाले घरकुल; रोटरी क्लब डिचोलीचा उपक्रम

Published

on

Spread the love

गोवा खबर : डिचोली रोटरी क्लबने सामाजिक बांधिलकी जपत पुन्हा एकदा समाजासाठी प्रेरणादायी कार्य केले आहे. मुडीवाडा खरपाल येथील निराधार पुनाजी गावस यांना क्लबच्या वतीने नविन घरकुल बांधून देण्यात आले. या घरकुलाच्या चाव्या आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आल्या.

या वेळी बोलताना आमदार शेट्ये म्हणाले, रोटरी क्लबने समाजातील गरजूंना दिलेला हा आधार स्तुत्य आहे.” काही महिन्यांपूर्वी मूळगावातील एका महिलेचे घर आगीत जळाले होते, तेव्हा देखील रोटरी क्लबने तिला नविन निवारा दिला होता.

कार्यक्रमाला क्लबचे अध्यक्ष स्वप्निल दीक्षित, सचिव सिद्धेश कुबल, माजी अध्यक्ष सागर शेट्ये, पंच नरेश गावस, पद्माकर मळीक, संजय शेट्ये, सचिन साळकर, समीर फळारी, डॉ. कौस्तुभ पाटणेकर आदी मान्यवर व गावकरी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी क्लबच्या कार्याचे कौतुक केले.

नवीन घराच्या उद्घाटनासाठी आमदार शेट्ये यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. पुनाजी गावस यांनी क्लबचे आभार मानले.