Connect with us

गोवा खबर

अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या गोवा केंद्रातर्फे हरित योग ट्रेक्सचे आयोजन

Published

on

Spread the love

गोवा खबर : अखिल भारतीय आयुर्वेद संस्था (AIIA), गोवा, आयुष मंत्रालय भारत सरकारच्या मार्गदर्शनाखाली, १५ जून २०२५ रोजी “हरित योग मोहिम” अंतर्गत गोव्यातील विविध प्रसिद्ध आणि ऐतिहासिक स्थळांवर योग ट्रेक्स आयोजित करून ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एक राज्यव्यापी, अनोख्या आणि पर्यावरणपूरक उपक्रमाचे यशस्वी आयोजन केले.

उपक्रमाचे नियोजन अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान गोवा, यांच्या डीन प्रो. डॉ. सुजाता कदम आणि प्रो. डॉ. मोहन जोशी साह्यडीन यांच्या मार्गदर्शना अंतर्गत डॉ. संजय खेडेकर, नोडल ऑफिसर गोवा राज्य यांच्यासह सर्व अध्यापक, विद्यार्थी, आणि कर्मचारी यांनी उस्पुरतपणे कार्यकाम पार पडला.

या उपक्रमाचा उद्देश “योग फॉर वन अर्थ, वन हेल्थ” या आयुष मंत्रालयाच्या अभियानाशी सुसंगत असून, योग व पर्यावरण जाणीवेच्या माध्यमातून सर्वांगीण आरोग्याला प्रोत्साहन देणे हा मुख्य हेतू आहे.

या मोहिमेंतर्गत अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या गोवाच्या २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी व ३० प्राध्यापकांनी १२ गटांमध्ये विभागून ५० हून अधिक सांस्कृतिक व निसर्गसंपन्न स्थळांवर योगाभ्यास केला. या स्थळांमध्ये तलाव, धबधबे, गुहा, मंदिरे, किल्ले, चर्च, समुद्रकिनारे, शैक्षणिक संस्था आणि युनेस्को मान्य वारसास्थळे यांचा समावेश होता. या उपक्रमाने योगाभ्यास आणि निसर्ग यांचा समन्वय साधत पर्यावरणजागरूकता, आध्यात्मिक प्रगती आणि समुदाय आरोग्य यांचे सशक्तीकरण केले.

भेट दिलेली ठिकाणे:

तलाव, धबधबे व गुहा: मये तलाव, हरवळेम धबधबा, केसारवल धबधबा, नेत्रावळी धबधबा, पांडव गुहा, सेंट जॅसिंटो बेट, रिवोना बौद्ध गुहा, बबल लेक.

वारसास्थळे: चापोरा किल्ला, आग्वाडा किल्ला, बॉम जीसस बॅसिलिका, ओल्ड गोवा चर्चेस, सेंट बार्थोलोम्यू चर्च, बिग फूट लुटोलिम, रीस मॅगोस किल्ला, वेरम, जपानी गार्डन वास्को, फार्मागुडी येथील शिवाजी पुतळा, थ्री किंग्स चर्च, मडेर कॅन्सोलीम, पद्मभूषण मनोहर पर्रीकर सभागृह, तपोलोक योगक्षेत्र, योग सेतू, परशुराम पुतळा, फोंटेनहास (युनेस्को वारसास्थळ), पनाजी चर्च ऑफ इमॅक्युलेट कॉन्सेप्शन.

मंदिरे: श्री. म्हाळसा नारायणी मंदिर, श्री. सप्तकोटेश्वर मंदिर, श्री.शांतादुर्गा मंदिर (सांकोळे व कवळे), श्री.कामाक्षी मंदिर, श्री.चंद्रेश्वर भूतनाथ मंदिर, श्री. मंगेशी मंदिर, भूत वाडी (पेडणे), श्री.बोडगेश्वर मंदिर (म्हापसा), श्री.लक्ष्मी नरसिंह मंदिर, श्री.धारेश्वर महादेव मंदिर,श्री. महालक्ष्मी मंदिर (बांदोडा), तांबडी सुरळा, श्री.रुद्रेश्वर, बिर्ला मंदिर, चांदोर शिव मंदिर, रामनाथ दामोदर संस्थान, श्री. विमलेश्वर मंदिर.

समुद्रकिनारे व नैसर्गिक स्थळे: अंजुना, वागाटोर, मिरामार, दोनापावल पॉइंट.

सांस्कृतिक व शैक्षणिक संस्था: गोवा विद्यापीठ, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, फोंटेनहास वारसास्थळ.

मुख्य क्रिया:

• सूर्यनमस्कार व कॉमन योगा प्रोटोकॉलसह योगाभ्यास

• अनुलोम-विलोम, भ्रमरी व भस्त्रिका यांसारखी प्राणायाम तंत्रे

• ध्यानसत्रे व निसर्ग ट्रेक्स – मानसिक स्थैर्यासाठी

• पर्यटक व स्थानिक नागरिकांनीही विविध ठिकाणी सहभाग नोंदवत योगाच्या आरोग्यदायी फायद्यांबाबत प्रचंड उत्साह दाखवला.

विशेष क्षण:

• बिग फूट लुटोलिम येथे प्रसिद्ध शिल्पकार मा. मेंद्र अल्वारेस यांनी योग सत्रात सहभाग घेतला.

• अनेक मंदिरे व स्थानिक संस्थांनी सहकार्य करून उपक्रम अधिक प्रभावी केला.

या हरित योग ट्रेक्स उपक्रमामध्ये योग, पर्यावरण व सांस्कृतिक वारसा यांचे सुंदर संमेलन घडवले. समाजाचे व्यापक सहकार्य लाभले आणि लोकांना योग जीवनशैली म्हणून स्वीकारण्याची प्रेरणा मिळाली – एक निसर्गाशी सुसंगत आणि निरोगी भविष्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल.

तसेच  आयुर्वेद संस्थानाने गेल्या १०० दिवसामध्ये राज्यातील विविध शाळा, महाविद्यालय, सरकारी कार्यालय, संशोधन संस्था, सार्वजनिक स्थळे या ठिकाणी १०० हुन अधिक योग प्रशिक्षण  आणि सादरीकरण यांचे यशस्वी  नियोजन केले.