Connect with us

गोवा खबर

पंतप्रधान मोदी यांनी एलोन मस्क यांच्याशी झालेल्या चर्चेत द्विपक्षीय तंत्रज्ञान सहकार्याची क्षमता केली अधोरेखित

Published

on

Spread the love

गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एलोन मस्क यांच्याशी दूरध्वनीवरून परस्पर हिताच्या विविध मुद्द्यांवर विधायक चर्चा केली. या वर्षाच्या सुरुवातीला वॉशिंग्टन डीसी येथे झालेल्या त्यांच्या भेटीदरम्यान चर्चेत समाविष्ट असलेल्या विषयांवर आज पुन्हा चर्चा झाली. आजच्या चर्चेतून तंत्रज्ञान विषयक प्रगतीसाठी सामायिक दृष्टिकोन अधोरेखित झाला.

तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात भारत आणि अमेरिका दरम्यान सहकार्याची प्रचंड क्षमता पंतप्रधानांनी अधोरेखित केली. या क्षेत्रात भागीदारी वाढवण्यासाठी भारताच्या दृढ वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.

पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटले आहे : “@elonmusk यांच्याशी  बोललो. या वर्षाच्या सुरुवातीला वॉशिंग्टन डीसी येथे झालेल्या आमच्या भेटीदरम्यान  ज्या विषयांवर चर्चा केली त्यासह विविध मुद्द्यांवर आम्ही चर्चा केली. आम्ही तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रातील सहकार्याच्या प्रचंड क्षमतेबाबत चर्चा केली. या क्षेत्रात अमेरिकेसोबतची आपली भागीदारी वृद्धिंगत करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे.”