Connect with us

गोवा खबर

पंतप्रधानांनी म्यानमारचे सिनियर जनरल ह्लाइंग यांच्याशी साधला संवाद 

Published

on

Spread the love

गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूकंप आपत्तीच्या पार्श्वभूमीवर म्यानमारचे सिनियर जनरल महामहिम मिन ओंग ह्लाइंग यांच्याशी आज संवाद साधला. या कसोटीच्या काळात म्यानमारबरोबर भारत एक जवळचा  मित्र व शेजारधर्माच्या भावनेने उभा असून मदतीसाठी वचनबद्ध असल्याचे पंतप्रधानांनी ठामपणे सांगितले.

या आपत्तीच्या निवारणासाठी भारताने ‘ऑपरेशन ब्रह्म’ सुरु केले असून त्यातून म्यानमारमधील भूकंपाने प्रभावित क्षेत्रांमध्ये त्वरित मदत पोचवण्याचे काम सुरु झाले आहे.