Connect with us

गोवा खबर

केंद्र सरकारचे 48.66 लाख कर्मचारी व 66.55 लाख निवृत्तीवेतनधारकांसाठी खुशखबर!

Published

on

Spread the love

गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता (डीए) आणि निवृत्तीवेतनधारकांना महागाई दिलासा (डीआर) निधीचा अतिरिक्त हप्ता 01.01.2025 पासून जारी करायला मंजुरी दिली. महागाईची भरपाई करण्यासाठी मूळ वेतन /निवृत्तीवेतनच्या सध्याच्या 53% दरात ही 2% वाढ करण्यात आली आहे.

महागाई भत्ता आणि महागाई दिलासा या दोन्हींमध्ये वाढ झाल्यामुळे सरकारी तिजोरीवर वर्षाला एकूण 6614.04 कोटी रुपयांचा भार पडणार आहे. केंद्र सरकारचे 48.66 लाख कर्मचारी आणि 66.55 लाख निवृत्तीवेतनधारकांना याचा लाभ मिळणार आहे.

ही वाढ सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींवर आधारित स्वीकृत सूत्रानुसार आहे.