Connect with us

गोवा खबर

नवाजुद्दीन सिद्दीकी व ‘बिग कॅश’वर कारवाई होणार?

Published

on

महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री  योगेश कदम यांना सुराज्य अभियानाच्या वतीने निवेदन देताना रवी नलावडे आणि सतीश सोनार .
Spread the love

गोवा खबर : हिंदू जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाच्या पाठपुराव्यानंतर पोलिसांच्या गणवेशात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांना दाखवणारी आणि जनतेला जुगार खेळण्यास प्रवृत्त करणारी वादग्रस्त ‘बिग कॅश पोकर’ जाहिरात अखेर सोशल मीडियावरून हटवली आहेमात्र दोषींवर कारवाई अद्याप झालेली नाहीत्यामुळे सुराज्य अभियानाच्या वतीने सतीश सोनार आणि रवी नलावडे यांनी महाराष्ट्रचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची भेट घेऊन ही जाहिरात म्हणजे पोलीस दलाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारा गंभीर प्रकार असल्याचे निदर्शनास आणले.

या भेटीत विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन कदम यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना तपास करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

ही जाहिरात हटवण्यात आली असलीतरी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि ‘बिग कॅश’चे मालक अंकुर सिंग यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाहीसुराज्य अभियानाने या प्रकरणात फेसबुकयूट्यूब आणि ट्विटर (X) यांच्या तक्रार निवारण अधिकार्‍यांकडे तक्रारी केल्या होत्यापरंतु कोणतीही कारवाई झाली नाहीअखेरीस तक्रार अपील समिती (GAC) कडे तक्रार केली आणि त्यानंतरच ही जाहिरात हटवण्यात आली

यात ‘बडे काम का खेल’ असे म्हणून ‘जुगार’ हा गुन्हे उकलण्यासाठी आवश्यक कौशल्य असल्याचे पोलीस वेशातील नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यांकडून प्रचारित करण्यात आले होतेतसेच यात भगवद्गीतेचा अवमानही करण्यात आला होतात्यामुळे सुराज्य अभियानाने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि ‘बिग कॅश पोकर’ आस्थापनावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचीतसेच भविष्यात पोलीस दलाच्या प्रतिमेचा गैरवापर थांबवण्यासाठी कठोर धोरण आखण्याची मागणी सरकारकडे केली आहे