Connect with us

गोवा खबर

छत्रपती शिवाजी महाराजांना मोदी यांनी केले अभिवादन

Published

on

Spread the love

गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे.

पंतप्रधानांनी  X या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटले आहे ;“छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो. त्यांच्या पराक्रमाने आणि दूरदर्शी नेतृत्वाने स्वराज्याची  पायाभरणी केली,  ज्यामुळे अनेक पिढ्यांना धैर्य आणि न्यायाची मूल्ये जपण्याची प्रेरणा मिळाली. ते आपल्याला एक बलशाली, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी प्रेरणा देत आहेत.”