Connect with us

गोवा खबर

कर्तव्य पथावरील प्रजासत्ताक दिन संचलनात यंदा गोव्याचा चित्ररथ

Published

on

Spread the love

गोवा खबर : 26 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली येथे कर्तव्य पथ येथे होणार्‍या 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात गोवा राज्याचा चित्ररथ सादर केला जाईल.

नवी दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये गोव्याचा चित्ररथ गोवा सरकारच्या माहिती आणि प्रसिध्दी खात्याच्या संयुक्त विद्यमाने सादर केला जाईल.
यावर्षी गोवा राज्य गोव्याच्या समृद्ध संस्कृती आणि प्रगतीचे चित्रण करणारा स्वर्णिम भारत… विरासत आणि विकास या संकल्पनेवर रंगीत चित्ररथ सादर करणार आहे.
गोव्यातील फोंडा येथील कलाकार सुशांत खेडेकर यानी चित्ररथाची संकल्पना आणि रचना केली आहे आणि 26 डिसेंबर 2024 पासून राष्ट्रीय रंगशाळा शिबिरात चित्ररथाच्या निर्मितीचे काम सुरू झाले आहे. खेडेकर आणि पूर्णानंद पैदरकर यांच्या नेतृत्वाखाली 30 शिल्पकार, कारागीर, फॅब्रिकेटर्स, सुतार आणि इतर लोकांची टीम चित्ररथ तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहते. आतापर्यंत 50 टक्के काम पूर्ण झाले आहे.

यावर्षी गोवा राज्य गोव्याच्या समृद्ध संस्कृती आणि प्रगतीचे चित्रण करणारा स्वर्णिम भारत…विरासत आणि विकास या संकल्पनेवर रंगीत चित्ररथ सादर करणार आहे. हा सर्व गोमंतकीयांसाठी अभिमानाचा क्षण असून गोव्याच्या समृद्ध संस्कृतीचे आणि प्रगतीचे चित्रण करणारा हा चित्ररथ 26 जानेवारी रोजी दोन वर्षांच्या कालावधीनंतर कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिन संचलनात प्रदर्शित करण्यात येईल. दोन वर्षांच्या कालावधीनंतर कर्तव्य पथावर 26 जानेवारी रोजी होणार्‍या प्रजासत्ताक दिनी केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने राज्य आणि संघप्रदेशासह 15 चित्ररथांची तसेच 10 मंत्रालये, विभागांच्या चित्ररथांची निवड केली आहे. ’स्वर्णिम भारत-विरासत आणि विकास’ म्हणजे ’सुवर्ण भारत…वारसा आणि विकास’ अशी या वर्षाची संकल्पना आहे.

यावर्षी या चित्ररथासाठी संगीत डॉ. साईश देशपांडे यांनी दिले आहे आणि दिनेश प्रियोळकर यांच्या नेतृत्वाखाली लाइव्ह डान्स सादर करण्यात येईल. नृत्यदिग्दर्शन निषाद यांनी केले आहे, तर वेशभूषा संगीता आणि अवनी खेडेकर यांनी केली आहे.

इतर  कलाकार, फॅब्रिकेटर्स आणि कारागीर जे फॅब्रिकेशनमध्ये गुंतलेले आहेत त्यात पांडुरंग शेट, सुरेश वरेंकर, वल्लभ चारी, प्रल्हाद शिलकर, विराज तेली, सुदेश शेटकर, महेश कुंभार, गौरेश शेटकर, कुशाली शेटकर, शेखर कुंभार, सतीश कुंभार, विनायक कुंभार, अशोक जलमी, अनुप यांचा समावेश आहे.

कावी कलाकार सागर नाईक मुळे यांनी देशाच्या राजधानीत जाऊन गोव्याच्या चित्ररथास आपली कलाकृतीची जोड दिली आहे. सोहम घाटे यांनी लॉजिस्टिक सपोर्ट दिला आहे.
कर्तव्य पथावरील संचलनानंतर 26 ते 31 जानेवारी 2025 या कालावधीत भारत पर्व सोहळ्याचा एक भाग म्हणून इतर सहभागी राज्यांसह गोव्याचा चित्ररथ लाल किल्ल्यावर प्रदर्शित केला जाईल. या काळात संबंधित राज्यांतील कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.