Connect with us

गोवा खबर

भांडवली गुंतवणूक योजना; गोव्याला 200 कोटी मंजूर : विश्वजित राणे

Published

on

Spread the love

गोवा खबर : केंद्र सरकारने भांडवली गुंतवणूक योजना 2024-25 अंतर्गत गोव्याला 200 कोटी रुपये मंजूर केले आहेत, अशी माहिती नगरविकासमंत्री विश्वजित राणे यांनी दिली.

योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार या निधीचा कार्यक्षम आणि वेळेवर वापर सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे राणे यांनी सांगितले.

या योजनेखाली भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य दिले जाते. 2023-24 या आर्थिक वर्षात केंद्र सरकारने योगायोगाने 386 कोटी कोटी रुपये मंजूर केले होते आणि गोव्यासाठी 224 कोटी 77 लाख रुपये मिळालेले आहेत. त्याच्या आदल्या वर्षी म्हणजे 2022- 23 मध्ये 572.75 कोटी रुपये मंजूर केले व सर्व रक्कम मिळाली तर 2021-22 मध्ये या विशेष सहाय्य योजनेअंतर्गत 111.04 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आणि ही देखील सर्व रक्कम मिळाली आहे.