Connect with us

गोवा खबर

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सचिवालयात नूतनीकृत कार्यालयाचे उद्घाटन

Published

on

Spread the love

गोवा खबर : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते आज पर्वरी येथील सचिवालय संकुलात तीन नव्याने नूतनीकरण करण्यात आलेल्या कार्यालयांचे उद्घाटन करण्यात आले. या सुविधांमध्ये कायदा आणि न्याय विभाग, कायदा (आस्थापना) विभाग आणि शिष्टाचार आणि आदरातिथ्य विभाग या नुतनीकरण केलेल्या कार्यालयाचा समावेष आहे.

यावेळी मुख्य सचिव डॉ. व्ही. कांदेवेलू, आयएएस, आयुक्त तथा सचिव (कायदा आणि न्याय विभाग)  संदिप जॅकीस, आयएएस  आणि शिष्टाचार सचिव संजित रॉड्रिग्स, आयएएस, अवर सचिव श्रेयस डिसिल्वा, जीएडीच्या अवर सचिव अंजू केरकर आणि इतर उपस्थित होते.

नूतनीकरण प्रकल्प गोवा हस्तकला ग्रामीण आणि लघु उद्योग विकास महामंडळाद्वारे कार्यान्वित करण्यात आला आणि निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यात आला.