गोवा खबर : उगते मळब आणि इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा, पणजी यांच्या वतीने लोककवी मनोहरराय सरदेसाई यांच्यावर 12 जानेवारी रोजी इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा हॉल, पणजी येथे ऑल गोवा आंतर महाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रत्येक महाविद्यालय दोन विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या संघाची नावे पाठवू शकतात. शिक्षक आणि माजी विद्यार्थी सहभागी होऊ शकत नाहीत. जास्त प्रवेश असल्यास, 11 जानेवारी रोजी स्क्रीनिंग सत्र आयोजित केले जाईल.
स्पर्धकांना स्पर्धेदरम्यान मोबाईल फोन, पेजर, फेसबुक, ईमेल आणि इतर वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही. हे वापरताना विद्यार्थी आढळल्यास त्यांना अपात्र ठरवले जाईल. केवळ चार संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. ही प्रश्नमंजुषा मनोहर राय सरदेसाई यांचे जीवन, कार्य आणि साहित्यिक योगदान यावर आधारित असेल.
प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या अटी व शर्ती स्पर्धेपूर्वी स्पष्ट केल्या जातील. प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशी तीन बक्षिसे असतील. आयोजकांचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असेल.
ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी 9 जानेवारीपर्यंत आपल्या प्रवेशिका श्री जॉन आगियार यांना 9822159705 या whatsaap वर पाठवाव्यात.