Connect with us

गोवा खबर

राज्यपालांकडून गोव्यातील लोकांना नाताळाच्या शुभेच्छा

Published

on

Spread the love

गोवा खबर: गोव्याचे राज्यपाल श्री पी एस श्रीधरन पिल्लई यांनी नाताळच्या आनंदी प्रसंगी गोव्यातील लोकांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, नाताळ हा सण जगभर प्रभु येशू ख्रिस्ताचा जन्म दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मित्र आणि कुटुंबातील सदस्य एकत्र येतात आणि आनंदाने नाताळ साजरा करतात. प्रभु येशू ख्रिस्त यांना देवाचा पुत्र मानला जातो, ज्यांनी शांतता, सहिष्णुता, त्याग, प्रेम आणि बंधुत्वाचा चिरंतन संदेश दिला. नाताळ आपल्याला मित्र आणि कुटुंबासह देवाण घेवाण करण्याच्या महत्त्वाची आठवण करून देतो. हा सण जात-पात आणि धर्माचा विचार न करता मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो तसेच सर्व लोकांना एकत्र आणणारा हा सण आहे.

या नाताळ सणाच्या प्रसंगी आपण प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेला मौल्यवान संदेश आचरणात आणूया  ज्यामुळे मानवी समाज अधिक सुखी आणि शांततामय होईल.

या वर्षीचा नाताळाचा सण आपण सर्वांना आनंद, शांतता आणि अधिक समृद्धी घेऊन येवो असे राज्यपाल आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.