गोवा खबर:जानेवारी २०२४ महिन्यात अंत्योदय अन्न योजनेच्या रेशनकार्ड धारकांना रेशनकार्डामागे ३५ किलो फोर्टिफाइड तांदूळ मोफत देण्यात येईल. प्राधान्यक्रम कुटुंबासाठी प्रति लाभार्थी ५ किलो फोर्टिफाइड तांदूळ मोफत देण्यात येईल.

दारिद्र्यरेषेवरील कार्डधारकांना १२.५० रूपये दराने प्रती कार्ड १२ किलो फोर्टिफाइड तांदूळ आणि प्रति कार्ड १० रूपये दराने ७ किलो गहू देण्यात य़ेईल.
कल्याणकारी संस्था योजनेच्या कार्डधारकांना ६.१५ रूपये किलो दराने १५ किलो फोर्टिफाइड तांदूळ आणि ४.८० रूपये किलो दराने १५ गहू वितरीत करण्यात येईल.
स्वस्त धान्य दुकानदारांनी ३१ डिसेंबरपर्यंत आपला धान्य कोटा उचलून रेशनकार्डधारकांना वितरीत करावा. धान्यासंबंधी कोणतीही तक्रार असल्यास रेशनकार्ड धारकांनी संबंधित मामलेदार किंवा नागरी पूरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्याकडे करावी.