गोवा खबर:मत्स्योध्योग आणि पशुसंवर्धन मंत्री श्री नीळकंठ हलर्णकर यांनी आज पेडणे येथील मामलेदार कार्यालयात आयोजित केलेल्या ६३ व्या गोवा मुक्ती दिन समारंभात राष्ट्रीय तिरंगा फडकविला. यावेळी आमदार श्री प्रविण आर्लेकर, पेडणेचे नगराध्यक्ष श्री मनोज हरमलकर, पेडणेचे उपजिल्हाधिकारी श्री शिवप्रसाद नाईक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक श्री संजय प्रभू देसाई, मुख्याधिकारी शैलेंद्र देसाई व इतर उपस्थित होते. यावेळी उपस्थितांसमोर बोलताना श्री. हळर्णकर यांनी गोव्याला पोर्तुगीज राजवटीतून मुक्त करण्यासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिक आणि हुतात्म्यांच्या योगदानाचे स्मरण केले ज्यामुळे गोव्यातील जनता हे स्वातंत्र्य उपभोगत आहे असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकार आपल्या राज्याला सुवर्णमध्य बनविण्यासाठी विविध विकासात्मक उपक्रम राबवित आहे असे ते पुढे म्हणाले.
केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांनी राज्यातील रस्त्यांच्या विकासासाठी पुढाकार घेतल्याबद्दल श्री. हळर्णकर यांनी त्यांचे आभार मानले. स्वयंपूर्ण गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मोहिमेमुळे राज्याच्या तसेच केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्यांच्या दारात पोहोचविण्यासाठी खूप मदत झाली आहे असेही श्री. हळर्णकर म्हणाले. केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराचे कौतुक करून एकात्मिक सी सर्व्हायव्हल ट्रेनिंग सेंटर हे राज्यातील युवकांसाठी मोठे वरदान ठरेल असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की ओएनजीसी सी सर्व्हायव्हल सेंटर हे एक प्रकारचे एकात्मिक प्रशिक्षण केंद्र म्हणून विकसित केले गेले आहे जेणेकरुन भारतीय सागरी सर्व्हायव्हल ट्रेनिंग इकोसिस्टमला जागतिक मानकांनुसार पुढे नेले जाईल. गोवा मुक्ती दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा देताना मंत्र्यांनी राज्याच्या विकासासाठी सरकारला सहकार्य देण्याचे आवाहन केले.
श्री रामचंद्र धावे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.