Connect with us

गोवा खबर

दिल्ली येथे 11 रोजी राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2022-23 चे आयोजन

Published

on

Spread the love
  • देशभरात विविध श्रेणींमध्ये 45 पुरस्कार विजेत्यांची निवड
    महाराष्ट्रातील मान्याची वाडी, बेला, मोडाळे, तिरोडा गावांसह यशदा संस्था यांना मिळणार पुरस्कार

गोवा खबर : केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाने 2022-2023 या वर्षासाठीच्या प्रतिष्ठित राष्ट्रीय पंचायत पुरस्कार प्राप्तकर्त्यांची घोषणा केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते येत्या 11 डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय पंचायत पुरस्कार करणार प्रदान करण्यात येणार असून पुरस्कारप्राप्त पंचायती राज संस्थांमध्ये यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 6 आस्थापनांचा समावेश आहे.

देशभरातील पंचायती राज संस्थांनी तळागाळातील सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासासाठी केलेल्या अनुकरणीय प्रयत्नांची दखल घेऊन हे पुरस्कार दिले जातात. 2022-23 च्या पुरस्कारांतील विविध श्रेणींमध्ये 45 पुरस्कार विजेत्यांची निवड करण्यात आली. यामध्ये दीनदयाळ उपाध्याय पंचायत शाश्वत विकास पुरस्कार,  नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत शाश्वत विकास पुरस्कार, ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पंचायत पुरस्कार, कार्बन न्यूट्रल विशेष पंचायत पुरस्कार आणि पंचायत क्षमता निर्माण सर्वोत्तम पुरस्कार आदींचा समावेश आहे. गरिबी निवारण, आरोग्य, बालकल्याण, पाण्याची पुरेशी उपलब्धता, स्वच्छता, पायाभूत सुविधांचा विकास, सामाजिक न्याय, महिला सक्षमीकरण आणि हवामान शाश्वतता यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी दिले जाणार आहेत.

महाराष्ट्रातील 6 पुरस्कार विजेत्यांमध्ये 4 ग्रामपंचायती, 1 पंचायत गट तर एका संस्थेचा समावेश आहे. यामध्ये  सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मान्याची वाडी ग्रामपंचायतीने तर दोन श्रेणींमध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकावण्याची कामगिरी केली. नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार श्रेणीमधून सर्वोत्तम ग्राम पंचायत पुरस्कार तसेच ग्राम उर्जा स्वराज विशेष ग्राम पंचायत अशा दोन पुरस्कारांवर मान्याजी वाडी ग्रामपंचायतीने आपले नाव कोरले.

तर, गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा पंचायत गटाला नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार श्रेणीअंतर्गत सर्वोत्तम पंचायत गट हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय, नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी गट अंतर्गत मोडाळे ग्रामपंचायतीला दीनदयाळ उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कार श्रेणीतील स्वच्छ व हरित ग्राम पंचायत हा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे याव्यतिरिक्त, भंडारा जिल्ह्यातील बेला ग्रामपंचायतीला कार्बन न्यूट्रल विशेष पंचायत पुरस्कारअंतर्गत तृतीय क्रमांचा पुरस्कार देण्यात येईल.

वरील सर्व पुरस्कारांसोबत पुण्यातील प्रतिष्ठित अशा यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) या संस्थेलाही राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2022-23 मधील पंचायत क्षमता निर्माण सर्वोत्तम संस्था पुरस्कार श्रेणीतील तृतीय क्रमांचाचा पुरस्कार देण्यात येणा

यावर्षी राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांच्या स्पर्धेत देशभरातील 1.94 लाख ग्रामपंचायती सहभागी झाल्या होत्या. त्यामधील 42 पुरस्कारप्राप्त पंचायतींपैकी 42% पंचायती या महिलांच्या नेतृत्वाखाली आहेत, हे विशेष.