Connect with us

गोवा खबर

९ आणि १० डिसेंबर रोजी मेगा अपार दिवस

Published

on

Spread the love

गोवा खबर : राज्यातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांसाठी ऑटोमेटेड परमनंट अकाडेमीक अकाऊंट रजिस्ट्री अपार आयडीच्या निर्मिती प्रक्रियेला गती देण्यासाठी शिक्षण संचालनालयाने 9 आणि 10 डिसेंबर हे दिवस ’मेगा अपार दिवस’ म्हणून घोषित केले आहेत.

या दिवशी शाळांनी विद्यार्थ्यांच्या नोंदी युडीआयएसई पोर्टलवर अपडेट करून अपार आयडी तयार करणे अपेक्षित आहे. त्यानंतर पुढील प्रत्येक महिन्याच्या याच दोन्ही दिवशी मेगा अपार दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

प्रत्येक शाळांतील शिक्षक आणि शिक्षिकेतर अशा सर्व कर्मचार्‍यांनी युडीआयएसई पोर्टलवर विध्यार्थ्यांची माहिती संकलित करण्याच्या कामी योगदान देण्याची विनंती करण्यात आली आहे. तसेच गोवा शिक्षण संचालनालयाने अपारआयडी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्व पालक आणि विद्यार्थ्यांनी आपापल्या शाळांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

राज्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी12-अंकी एक अव्दितीय आयडी असणार आहे जो खासगी, अनुदानित आणि सरकारी शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. ही प्रणाली म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या एक राष्ट्र, एक विद्यार्थी आयडी कार्यक्रमाचा भाग आहे. त्याद्वारे विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती संकलन सुलभ करणे आणि शालेय नोंदीचे व्यवस्थापन सुधारण्यात येणार आहे.

या आयडीमुळे विद्यार्थ्यांना डिजी लॉकर्समध्ये त्यांचे शैक्षणिक, परीक्षांचे निकाल, रिपोर्ट कार्डस् आणि इतर सुसंस्कृततेची माहिती डिजीटल स्वरूपात संग्रहित करण्याची संधी मिळणार आहे. याचा फायदा त्यांनी पुढील उच्च शिक्षण किंवा नोकरी मिळवण्यासाठी होणार आहे.