गोवा खबर:देशातील महत्वाच्या बंदरांमधील जहाजाच्या कार्यपूर्तीचा सरासरी वेळ (टर्न अराउंड टाइम) 2013-14 मध्ये लागणाऱ्या 93.59 तासांवरून खाली येऊन 2023-24 मध्ये 48.06 तासांवर आला आहे. म्हणजेच या वेळात 48.65% बचत झाली आहे. हा टर्न अराउंड टाइम कमी करण्यासाठी सरकारने विविध उपाययोजना केल्या आहेत. उदा. नवीन बर्थ (जहाज उभे करण्याची जागा ), टर्मिनल्स, पार्किंग प्लाझा बांधणे, सध्या उपलब्ध असलेल्या बर्थ व टर्मिनल्स चे यांत्रिकीकरण/आधुनिकीकरण करून त्यांना अधिक फायदेशीर बनवणे, डिजिटॅलिकरणमार्फत विविध प्रणालींना अधिक कार्यक्षम बनवणे, बंदरापासून दूर असलेल्या प्रदेशांशी दळणवळण सुधारण्यासाठी रेल्वे व रस्त्यांचे जाळे तयार करणे, इत्यादी.
प्रत्येक महत्वाच्या बंदराचा आर्थिक वर्ष 2023-24 मधील टर्न अराउंड टाइम दर्शवणारा तक्ता पुढे दिला आहे :
| Ports |
FY 2023-24
(in hours) |
| Deendayal Port |
54.24 |
| Mumbai Port |
62.97 |
| Jawaharlal Nehru Port |
26 |
| Mormugao Port |
65.61 |
| New Mangalore Port |
40.44 |
| Cochin Port |
33.4 |
| V.O. Chidambaranar Port |
51.36 |
| Chennai Port |
44.92 |
| Kamarajar Port |
44.37 |
| Visakhapatnam Port |
65.86 |
| Paradip Port |
41.61 |
| Syama Prasad Mookerjee Port |
60.85 |
| Overall |
48.06 |
महत्वाच्या बंदरांमध्ये जहाजांना बर्थ चे वाटप करणे व जहाजांचा अनुक्रम ठरवणे यासाठी मंत्रालयाने जारी केलेल्या बर्थिंग धोरणाचा आधार घेतला जातो. महत्वाच्या बंदरांवरील पायाभूत सुविधांचा विकास व क्षमतावर्धन ही एक सतत सुरु राहणारी प्रक्रिया आहे. यात नवीन बर्थ व टर्मिनल्स बांधणे , सध्या उपलब्ध असलेल्या बर्थ व टर्मिनल्स चे यांत्रिकीकरण करणे, मोठ्या आकाराच्या जहाजांना आकर्षित करण्यासाठी ड्रेजिंग करून बंदराजवळच्या समुद्राची खोली वाढवणे, रस्ते व रेल्वेचे जाळे उभारणे, इत्यादी.
ही माहिती केंद्रीय बंदरे, नौवहन व जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आज राज्यसभेत एका लिखित उत्तरात दिली आहे.