Connect with us

गोवा खबर

गोवा मनोरंजन संस्थेतर्फे इफ्फीमध्ये ‘मास्टरक्लास’

Published

on

Spread the love

गोवा खबर : ’इफ्फी’वेळी गोमंतकीय दिग्दर्शक, निर्माते, कलाकार तसेच इतर संबंधित व्यक्तींना व्यासपीठ मिळावे यासाठी गोवा मनोरंजन संस्थेतर्फे ‘मास्टरक्लास’चे आयोजन करण्यात आले आहे. त्याशिवाय गोमंतकीय चित्रपटांच्या मेजवानीचाही आस्वाद उपस्थितांना घ्यायला मिळणार आहे, अशी माहिती गोवा मनोरंजन संस्थेच्या उपाध्यक्ष डिलायला लोबो यांनी दिली.

डिलायला लोबो

संस्थेच्या सभागृहात गुरुवारी पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. शर्मद रायतुरकर, कुबेरंस इन्स्टिट्यूटचे जीत वाघ यावेळी उपस्थित होते.

झी स्क्वेअर येथे 25, 26 आणि 27 रोजी ‘मास्टरक्लास’चे आयोजन करण्यात आले आहे. 25 रोजी सायंकाळी 4 वाजता झी स्टुडिओचे सीईओ शारिख पटेल, 26 रोजी नरेंद्र भट तर 27 रोजी राजेश कृष्णन यांचा मास्टरक्लास होणार आहे. तसेच 25 रोजी सायंकाळी 6 वाजता रोहन सिप्पी यांचादेखील मास्टरक्लास होण्याची शक्यता आहे.

गोवा मनोरंजन संस्थेतर्फे खास गोमंतकीय चित्रपट विभागात यंदा 14 चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. या गटासाठी 25 चित्रपटांनी नोंदणी केली होती. यंदा गोवन डायरेक्टर्स कट’ हा नवीन विभागही सुरू करण्यात येणार आहे. निवडलेल्या 14 मधील 4 चित्रपट या विभागासाठी निवडण्यात आले आहेत. या सर्व चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान गोमंतकीयांनी उपस्थिती लावावी, असे आवाहन लोबो यांनी केले.