गोवा खबर : गोवा सरकारचे आयटी, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन खाते, आयटीईअँडसी मंत्री, रोहन खंवटे यांच्या नेतृत्वाखाली राज्याला जागतिक नावीन्य केंद्र म्हणून स्थान देण्यासाठी धोरणात्मक भागीदारी निर्माण करत आहे. आग्वाद येथील ऐतिहासिक संग्रहालयात १७ नोव्हेंबर रोजी गोव्याने ‘मीट द ड्रेपर्स’ या जागतिक स्तरावर प्रसिद्ध स्टार्टअप पिच शोचे आयोजन केल्यामुळे उद्योजकांना आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांशी संपर्क साधण्याची आणि १ दशलक्षपर्यंतच्या निधीसाठी स्पर्धा करण्याची संधी देत, सरकारची ही दृष्टी केंद्रस्थानी असल्याचे दिसून आले.
खंवटे यांनी टीम ड्रेपर आणि त्यांच्या गटासोबत गोव्याच्या दृष्टीवर चर्चा केली आणि भारतातील एक प्रमुख आयटी हब तसेच सर्जनशीलतेची राजधानी म्हणून उदयास येण्याच्या गोव्याच्या आकांक्षांवर भर दिला. त्यांनी ड्रेपरला राज्यात ‘ड्रेपर हाऊस’ स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले आणि सरकारची नवकल्पना चालविण्याची तसेच उद्योजकता वाढवण्याप्रती कटिबद्धता अधोरेखित केली.
“मीट द ड्रेपर” कार्यक्रमा दरम्यान, टिम ड्रेपरने स्टार्टअप्समध्ये औद्योगिक भांडवलदार शोधत असलेल्या प्रमुख घटकांची रूपरेषा सांगितली: एक म्हणजे मोठी बाजारपेठ, अद्वितीय तंत्रज्ञान आणि प्रेरित लोक यांचा त्यात समावेश होता. भारतात उपक्रम सुरू करण्याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले, की त्यासाठी मूल्यांकन सुरू आहे. महिला उद्योजकांच्या विषयावर, ड्रेपर यांनी टिप्पणी केली, की “उद्योजक हे उद्योजक असतात, ते लैंगिकतेने विभागलेले नाहीत.” त्यांनी गोव्याबद्दलचे त्यांचे विचार देखील व्यक्त केले. ते म्हणाले, की “गोवा हे एक सुंदर ठिकाण आहे आणि उद्योजकांसाठी येथे उत्कृष्ट वातावरण आहे. येथे ‘ड्रेपर स्टार्टअप हाऊस’ तयार करण्याबाबत आम्ही आशावादी आहोत.”*
पीच करण्याच्या दिवशी विविध क्षेत्रातील, चार आशादायक स्टार्टअप्सचे प्रदर्शन करण्यात आले, प्रत्येकाने त्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना सादर केल्या. गोवा ॲप, हे एक गोवा-आधारित स्टार्टअप असून एक पर्यटन प्रवास मार्गदर्शक, प्रवासाची योजना आखणारे, साहस शोधणारे, वाहने भाड्याने घेणे, इव्हेंट एक्सप्लोर करण्यासाठी आणि गोव्याला भेट देण्यासाठी मदत करते व ट्रिप सोयिस्कर बनवते. अवनी वेलनेस हे, शाश्वत मासिक पाळी वेळची काळजी, अंतर्गत काळजी आणि अनेक उत्पादनांमध्ये तज्ञ असलेला हा महिला आरोग्य ब्रँड, दररोजच्या आरामासाठी स्वच्छतापूर्ण आणि विश्वासार्ह उपाय प्रदान करतो. समारो, या गोव्यातील ‘फायर’ सह असलेल्या इव्हेंट तंत्रज्ञान कंपनीने आयोजकांना ऑपरेशन्स सुव्यवस्थित करण्यात, उपस्थितांच्या सहभागाला चालना देण्यास आणि इव्हेंट आरओआय जास्तीत जास्त करण्यासाठी, डिझाइन केलेल्या इव्हेंट व्यवस्थापन साधनांचा सर्वसमावेशक संच पुरवला आहे. कारवारमधील हेल्थ-टेक स्टार्टअप लार्कएआय, हा सुरुवातीच्या टप्प्यावर हृदयाच्या समस्या शोधण्यासाठी एआय चा वापर करतो. लार्कएआय इकोसिस्टम वास्तविक वेळेनुसार परिमाणात्मक विश्लेषणासह, जटिल कार्डिओपल्मोनरी विसंगतींचे त्वरित निदान करण्यास सक्षम करते आणि लवकर निदान व उपायांद्वारे लोकांचे जीवन सुधारण्याचे उद्दिष्ट ठेवून निदान करते. त्यांच्या पीच उदयोन्मुख बाजारपेठेतील संधींचा वापर करताना, महत्त्वाच्या आव्हानांचे निराकरण करण्यावर लक्ष केंद्रित करत होत्या. ड्रेपर आणि त्याच्या टीमने रचनात्मक अभिप्राय दिला तसेच सहभागींना वाढ व क्षमतेसाठी धोरणांसह सुसज्ज केले.
‘मीट द ड्रेपर्स’ कार्यक्रमाने स्थानिक स्टार्टअपला जागतिक संधींशी जोडण्यासाठी, दृष्टी, मार्गदर्शन आणि आवश्यक संसाधनांमध्ये प्रवेश, यासारख्या उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. अशा कार्यक्रमांना पाठिंबा देऊन, गोवा सरकार, सशक्त उद्योजकीय इकोसिस्टमचे पोषण करण्याची, आपली वचनबद्धता अधिक बळकट करते. या पुढाकाराने गोव्याला नावीन्यपूर्णतेसाठी एक प्रमुख गंतव्यस्थान म्हणून, स्थान दिले आहे. जे स्टार्टअप्सना पुढे जाण्यासाठी, आंतरराष्ट्रीय एक्सपोजर मिळविण्यासाठी आणि जागतिक बाजारपेठांशी संलग्न होण्यासाठी मौल्यवान संधी प्रदान करते.