Connect with us

गोवा खबर

प्रजासत्ताक संचलनास हजर राहण्यास आदिवासी सदस्यांकडून नामांकने आमंत्रित

Published

on

Spread the love

गोवा खबर:आदिवासी कल्याण संचालनालयाने नवी दिल्लीत २०२५ च्या प्रजासत्ताक दिवस संचलन सोहळ्यास हजर राहण्यासाठी गोवा राज्यातील खास करून बीपीएल वर्गातील दोन अनुसूचित जमातीतील प्रतिनिधी कडून (एक पुरूष आणि  एक महिला) नामांकने मागविली आहेत.

   नवी दिल्लीत २०२५ च्या प्रजासत्ताक दिवस संचलन सोहळ्यास हजर राहण्यासाठी इच्छुक असलेल्या  गोवा राज्यांतील पात्र आणि ज्यांचे वय साठ वर्षांवर नाही अशा व्यक्तिंनी आपले नामांकन विहित नमुन्यात संचालक, आदिवासी कल्याण संचालनालय, श्रमशक्ती भवन, ५ वा मजला, पाटो-पणजी येथे १० नोव्हेंबर २०२४ पर्यंत सुपूर्द करावे. विहित नमुन्यातील अर्ज आदिवासी कल्याण संचालनालयात उपलब्ध आहेत.

 निवड झालेल्या व्यक्तिंना पारंपारिक वेषात प्रजासत्ताक दिवस संचलन सोहळ्यास हजर राहावे लागेल आणि नवी दिल्लीत २२ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ पर्यंत वास्तव्य करावे लागेल. गोवा ते दिल्ली ये-जा करण्याचा खर्च तसेच जेवण-खाणे आणि निवासाचा खर्च राज्य सरकारतर्फे करण्यात येईल.