गोवा खबर : मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, गोवा यांनी गोवा विद्यापीठाच्या सहकार्याने गोवा विद्यापीठ ग्रंथालयापासून ते ओडशेल जंक्शनपर्यंत “वॉल्काथॉन २०२४” चे आयोजन केले. विशेष सारांश पुनरावृत्ती २०२५ आणि मतदार नोंदणीचे महत्त्व याबद्दल जागरुकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा, आयएएस, यांनी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे यावर भर दिला. त्यांनी सहभागी विद्यार्थ्यांना त्यांच्या समाजातील विशेषतः मतदार ओळखपत्र नसलेल्या व्यक्तींना आणि उज्ज्वल भविष्यासाठी नावनोंदणी करण्यास प्रवृत्त करण्यासाठी प्रोत्साहित केले.
संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी आणि स्वीप नोडल अधिकारी त्रिवेणी वेळीप, यांनी मतदार ओळखपत्राची महत्त्वाची भूमिका प्रतिपादली आणि मतदार ओळखपत्र मिळविण्यासाठीची प्रक्रियेची माहिती दिली.
कार्यक्रमाला नोडल अधिकारी गेर्वासियो मेंडीस उपस्थित होते. डॉ. श्रद्धा नाईक आणि डॉ. विजय गावस, गोवा विद्यापीठातील प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
९, १०, २३ आणि २४ नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिरे आयोजित केली जातील. उमेदवार २९ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर २०२४ पर्यंत मतदार म्हणून स्वतःची नोंदणी करू शकतात. अधिक माहितीसाठी, मतदार हेल्पलाइन ॲप डाउनलोड करा किंवा www.voters.eci.gov.in .या संकेतस्थळावर भेट द्यावी.