Connect with us

गोवा खबर

उसगाव, शिरोडा गावे टीबीमुक्त; पंचायतीही होतील रोगमुक्त : विश्वजित राणे

Published

on

Spread the love

गोवा खबर : उसगाव आणि शिरोडा ही गावे क्षयमुक्त (टीबी) झाली आहेत. येत्या काही दिवसांत अनेक पंचायती क्षयरोगमुक्त होतील, असा विश्वास आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी व्यक्त केला.

पणजी येथील गोवा मनोरंजन संस्थेच्या सभागृहात सोमवारी राष्ट्रीय क्षयरोगमुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून राणे बोलत होते. कार्यक्रमाला क्षयरोगमुक्त गोवाच्या ब्रेड अ‍ॅम्बेसिडर अभिनेत्री वर्षा उसगावकर, अभिनेता जॉन डिसिल्वा व आरोग्य खात्याचे पदाधिकारी उपस्थित होते.

क्षयरोगमुक्त (टीबी) गोवा हे आमचे मुख्य ध्येय आहे. राज्याला क्षयरोगमुक्त करण्याचे धोरण आम्ही गेली अनेक वर्षे राबवत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ’क्षयरोगमुक्त पंचायत’ उपक्रमांतर्गत आम्ही पंचायतींना सक्रिय करून अनेक उपाययोजना राबविल्या असल्याचे राणे यांनी सांगितले.

राज्यातील आरोग्यक्षेत्रातील विकास हा खरोखरच उल्लेखनीय आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी अनेक दर्जेदार उपक्रम हाती घेत आरोग्य खात्याच्या साहाय्याने अनेक महत्त्वाची कामे केली आहेत. आधुनिक यंत्रणादेखील राज्यात उपलब्ध आहेत. राज्यभरात क्षयरोग जागृती करण्याबाबतचे पोस्टरदेखील लावणे आवश्यक आहे, असे मत वर्षा उसगावकर यांनी यावेळी व्यक्त केले.

या कार्यक्रमांतर्गत क्षयरोगमुक्त पंचायती तसेच रील तयार करणे स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.