गोवा खबर : गोवा स्टार्टअप बूटकॅम्प यात्रा २०२४ या दोन दिवसीय कार्यक्रमाची सुरुवात पणजी येथील गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (जीसीसीआय) येथे राज्यातील उद्योजकांच्या पुढच्या पिढीला सक्षम बनवण्याच्या उद्देशाने झाली आहे.
गोवा सरकारच्या माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स (डीआयटीईअँडसी) विभागांतर्गत असलेल्या, स्टार्टअप आणि आयटी प्रमोशन सेलतर्फे आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम इच्छुक विद्यार्थी, उद्योजक आणि स्टार्टअप्सना पाठबळ देण्यासाठी तयार करण्यात आला आहे, कारण हे महत्वकांक्षी, यशस्वी व्यवसाय उभारण्याच्या दिशेने पावले मारत आहेत.
आयटी, इलेक्ट्रॉनिक्स, डीआयटीई आणि कम्युनिकेशन मंत्री रोहन खंवटे, डीआयटीईअँडसीचे संचालक प्रसन्न आचार्य, आयएएस, डीआयटीईअँडसीचे संयुक्त संचालक मिलिंद साखरदांडे, स्टार्टअप आणि आयटी प्रमोशन सेलचे सीईओ डी. एस. प्रशांत आणि डीआयटीईअँडसी मंत्र्यांचे ओएसडी, नेव्हिल नोरोन्हा यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. हा बूटकॅम्प, सहभागींना त्यांच्या स्टार्टअप कल्पना सुधारण्यासाठी आणि उद्योग तज्ञांकडून व्यावहारिक अंतर्दृष्टी मिळविण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करतो. पहिल्या दिवशी सुरुवातीच्या टप्प्यातील आव्हानांचा अभ्यास करण्यासाठी आवश्यक धोरणांवर लक्ष केंद्रित करण्यात आले.
प्रशांत म्हणाले, आम्ही तरुण उद्योजकांमध्ये बदल घडवून आणण्याची क्षमता पाहतो तसेच संसाधने व मार्गदर्शनाद्वारे आम्ही त्यांना त्यांच्या कल्पना, प्रत्यक्षात आणण्यास मदत करतो. स्टार्टअप यात्रा बूटकॅम्प हा या प्रयत्नांचा एक भाग आहे, जो केवळ शिक्षित करण्यासाठीच नाही तर तरुण उद्योजकांना इकोसिस्टममधील महत्त्वाच्या व्यक्तींशी जोडण्यासाठी, तयार केलेला आहे. यात गुंतवणूकदार आणि मौल्यवान मार्गदर्शन देऊ शकतील, अशा उद्योग तज्ञांचा समावेश आहे.
आचार्य यांनी सांगितले, स्टार्टअप यात्रा बूटकॅम्प २०२४ मध्ये, आम्ही गोव्यात उद्योजकीय परिसंस्थेचा पाया रचत आहोत. २०४७ पर्यंत देशाला विकसित राष्ट्रात रूपांतरित करण्याचे सरकारचे उद्दिष्ट, विकसित भारताची दृष्टी प्रतिबिंबित करते.

खंवटे यांनी या क्षेत्राच्या प्रगतीसाठी केलेल्या प्रयत्नांची त्यांनी कबुली दिली. याशिवाय, २०२७ पर्यंत १,००० स्टार्टअप्सना समर्थन देण्याचे आणि १०,००० नोकऱ्या निर्माण करण्याचे, गोवा सरकारचे उद्दिष्ट आहे. गोव्याच्या स्टार्टअप इकोसिस्टमला बळकटी देण्यासाठी सरकार जागतिक इनक्यूबेटर्स, गुंतवणूकदार आणि राष्ट्रीय संस्थांसोबतही सहकार्य करत आहे.
या यात्रेची सुरुवात सिद्धार्थ गोयल यांनी ‘ग्लोबल स्टुडंट एंटरप्रेन्योर’ पुरस्कार ही स्पर्धा जाहीर करून केली. ही स्पर्धा महाविद्यालय किंवा विद्यापीठात असताना, व्यवसाय चालवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक प्रतिष्ठित स्पर्धा आहे. यानंतर, सहभागींना भारत ब्लॉकचेन अलायन्सचे संस्थापक आणि सीईओ राज कपूर यांच्याकडून एआय टूल्सचा वापर करून उद्देश-चालित सादरीकरणे तयार करण्यावर एक आकर्षक सत्र आयोजित करण्यात आले, ज्यात सर्वांना कपूर यांच्याकडून प्रेरणा मिळाली. डेक्टोपस, रिलेटो, ब्युटीफुल.एआय, पॉप.एआय आणि झोहो शो यासह सादरीकरणे करण्यासाठी, त्यांनी अनेक एआय साधने दाखविली. या कार्यशाळेने संवाद वाढविण्यासाठी आणि उद्योजकीय कल्पना प्रभावीपणे व्यक्त करण्यासाठी, तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यास व्यावहारिक तंत्र प्रदान केले.
बूटकॅम्पमध्ये, विद्यार्थ्यांनी वाहतूकीचे उपाय, होलोग्राम, हेल्थ टेक, बस ट्रॅकिंग ऍप्लिकेशन्सपासून ते अनोख्या फॉर्म्युलेशनपर्यंत त्यांच्या नाविन्यपूर्ण व्यवसाय संकल्पना सादर केल्या. खंवटे यांनी सहभागींसोबत चर्चा केली आणि गोव्यातील तरुण उद्योजकांच्या कल्पना समजून घेण्याची गरज, अधोरेखित केली. ते म्हणाले, या संवादाचा उद्देश, गोव्यातील तरुण नवोदितांच्या विचार प्रक्रियेची अंतर्दृष्टी समजून घेणे हा आहे. आमची धोरणे परिवर्तनशील आणि सहाय्यक राहतील, याची खात्री करून शैक्षणिक अभ्यासक्रम व उद्योगाच्या माहितीसह संरेखित आहेत. मेंटॉरशिप हा यातील एक आवश्यक भाग आहे आणि सरकार स्टार्टअपना सुरुवातीच्या टप्प्यात, सहाय्य प्रदान करण्यास वचनबद्ध आहे. मान्यताप्राप्त महाविद्यालयांद्वारे शिफारस केलेल्या कल्पनांना, त्यांचे उपक्रम वाढविण्यात मदत करण्यासाठी निधी सहाय्यासह, सरकारी समर्थन दिले जात आहे.
या नेटवर्किंग सत्राने सादरीकरणांव्यतिरिक्त, सर्व सहभागींना एकमेकांशी जोडण्यासाठी आणि उद्योजक समुदायामध्ये मौल्यवान संबंध निर्माण करण्यास, आवश्यक वातावरण प्रदान केले.
कार्यशाळा विभागामध्ये हेडस्टार्ट नेटवर्क फाऊंडेशनच्या, धोरणात्मक भागीदारी आणि ऑपरेशन्सच्या प्रमुख वानिया दंगवाल यांनी, बिझनेस मॉडेल कॅनव्हास बद्दल माहिती दिली आणि सहभागींना त्यांच्या व्यवसायाची रचना व कल्पना साकारण्यात मार्गदर्शन केले. त्यांनी किमान व्यवहार्य उत्पादन (एमव्हीपी) विकसित करण्यावर देखील एक सत्र घेतले, जिथे सहभागींनी वास्तविक-जगातील उदाहरणे आणि जलद प्रोटोटाइपिंग तंत्रांनी समर्थित अश्या, एमव्हीपी योजनांचे रेखाटन करण्यासाठी सहकार्य केले.
सहभागींनी मार्गदर्शकांच्या अभिप्रायाच्या आधारे, त्यांची सादरीकरणे तयार केली व दुसऱ्या दिवसासाठी सर्व सज्ज होऊन, पहिल्या दिवसाची सांगता झाली.
गोवा स्टार्टअप यात्रा बूटकॅम्प हा गोवा सरकारच्या स्टार्टअप आणि आयटी प्रमोशन सेलचा, राज्यात एक समृद्ध अशी उद्योजकीय परिसंस्था निर्माण करण्याच्या समर्पणाचे प्रतिबिंबित आहे. या उपक्रमाद्वारे, महत्त्वाकांक्षी उद्योजकांना आवश्यक संसाधने, कौशल्ये आणि जोडण्यांनी सुसज्ज केले जाते, ज्यामुळे त्यांना नावीन्यपूर्ण कल्पनांद्वारे गोव्याच्या विकासात योगदान देण्यास मदत होते.