Connect with us

गोवा खबर

हिंदू जनजागृती समितीतर्फे प्रथमोपचार विषयावर प्रवचने

Published

on

Spread the love

गोवा खबर : प्रथमोपचाराचे महत्त्व ओळखूनच समाजातील व्यक्तींना याबाबत माहिती देण्याच्या उद्देशाने हिंदू जनजागृती समितीच्या वतीने प्रथमोपचार प्रशिक्षण वर्ग मोफत घेतले जातात. प्रथमोपचाराची माहिती देणारी प्रवचनेही घेतली जातात. महिला स्वयंसाहाय्य गट आणि क्लस्टर लेवल फेडरेशन यांच्यासाठी नुकतीच तीन प्रवचने घेण्यात आली.

बिठ्ठोण (पर्वरी) येथे डॉ. संध्या गुपचूप यांनी मार्गदर्शन केले. चोडण येथे चोडण-माडेल पंचायतीच्या जुन्या सभागृहात, तर चिंबल येथे पंचायत सभागृहात सौ. नताशा वत्सा यांनी प्रवचन घेतले. या प्रवचनांचा एकूण ७८ महिलांनी लाभ घेतला. प्रवचनानंतर नाडी कशी तपासावी आदींची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. विषयाचे महत्त्व लक्षात घेऊन अनेकांनी आपल्या शंकांचे निरसनही करून घेतले.