गोवा खबर : भारतीय मानक मंडळाच्या हुबळी शाखा कार्यालयाने गोवा सरकारच्या नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार संचालनालय, उद्योग व्यापार आणि वाणिज्य संचालनालय, वजन व माप संचालनालय गोवा यांच्या संयुक्त सहकार्याने आणि एमएसएमई विभाग, गोवा चेंबर ऑफ कॉमर्स एन्ड इंडस्ट्रीस, गोवा राज्य उध्योग संघटना आणि इतर उध्योग संघटनेच्यां समन्वयाने आयोजित केलेल्या व्यावसायिकांच्या परिषदेचे नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार संचालक जयंत तारी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
शाश्वत विकास ध्येयांसाठी उत्कृष्ठ जागतिक मानकासाठी दृष्टी अशी २०२४ च्या जागतिक मानक दिनाची संकल्पना आहे.
आपल्या मुख्य भाषणात जयंत तारी यांनी दैनंदिन जीवनात मानांकनाच्या महत्त्वाच्या भर दिला. उद्योग, व्यवसाय आणि व्यापार क्षेत्रात गुणवत्ता आणि दर्जा राखण्यासाठी मानांकन एक महत्त्वाचे पाऊल आहे असे त्यांनी सांगितले. त्यांनी जागतिक मानक दिनाचे महत्त्व प्रतिपादले. शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जागतिक मानक दिवस महत्वाचा असल्याचे ते म्हणाले.

हुबळी शाखा कार्यालयाचे प्रमुख डीपी कुमार यांनी स्वागतपर भाषण केले. त्यानंतर आशुतोष अग्रवाल, वैज्ञानिक-बी/सहायक संचालक यांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले.
गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या प्राध्यापिका डॉ. दिव्या सिंघल यांचेही यावेळी भषण झाले. उपस्थितांमध्ये व्यावसायिक, हुबळी शाखेचे अधिकारी, सरकारी अधिकारी, प्राध्यापक आणि विद्यार्थी यांचा समावेश होता.
सूत्रसंचालन जेसिका शर्मा यांनी सूत्रसंचालन केले तर सहायक संचालक आशुतोष अग्रवाल यांनी आभार मानले.