गोवा खबर : राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांनी लोकांना दुर्गा पूजेच्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, दुर्गापूजा हा आपल्या देशातील एक महत्त्वाचा सण आहे आणि हा सण दरवर्षी मोठ्या उत्साहाने आणि सलोख्याने साजरा केला जातो. दुर्गा देवीची उपासना भक्तांना भीती, नकारात्मक विचार दूर करण्यास आणि शांती प्राप्त करण्यास मदत करते. हा दिवस देवी दुर्गाने दैत्य राजा महिषासुरावर मिळविलेल्या विजयाचे प्रतीक आहे. हा सण वाईट प्रवृतीवर सत्याचा विजय, अंधारावर प्रकाशाचा आणि जगाचे रक्षण करण्यासाठी दैवी शक्तीचे प्रतीक आहे.

दुर्गापूजेच्या या उत्सवाच्या प्रसंगी, मी दुर्गा मातेकडे प्रार्थना करतो की माता दुर्गा देवीचा आपण सर्वांवर आशीर्वाद असो आणि माता दुर्गा आपण सर्वांना आनंदाचे आणि समृद्धीचे जीवन जगण्यास आणि आपल्या सुंदर राज्यात आणि संपूर्ण राष्ट्रामध्ये प्रचलित सामाजिक आणि सांस्कृतिक सलोखा बळकट करण्यास आशिर्वाद देवो असे राज्यपाल आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.