गोवा खबर: उद्योजकांना सक्षम बनवण्याच्या उपक्रमात, *’फ्लिप द क्लासरूम : स्टार्टअप स्ट्रगल्स’ विस्डम फ्रॉम द इकोसिस्टम* या संकल्पनेखाली गोव्याच्या स्टार्टअप संस्थापकांना (फाउंडर्स) मडगाव येथील फोरम फॉर इनोव्हेशन इनक्युबेशन रिसर्च अँड एंटरप्रेन्यूअरशिप (फायर) येथे एकत्र आणण्यात आले. गोवा सरकारच्या माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स (डीआयटीईअँडसी) विभागांतर्गत स्टार्टअप व आयटी प्रमोशन सेलने फायर गोवा येथे, स्टार्टअप ग्राइंड गोवा चॅप्टरच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित केला. स्टार्टअप ग्राइंड गोवा चॅप्टर, हा जागतिक स्टार्टअप ग्राइंड नेटवर्कचा एक भाग असून स्टार्टअप्सच्या वाढीमध्ये मदत करण्यास आवश्यक संसाधने प्रदान करून उद्योजकांना शिक्षित करून, प्रेरणा देऊन एकत्रित आणण्यावर लक्ष केंद्रित करतो. या कार्यक्रमाने संस्थापकांना वास्तविक-जगातील आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि त्यांचे व्यवसाय पुढे नेण्यासाठी तज्ञ-चालित उपाय प्राप्त करण्यास एक धोरणात्मक व्यासपीठ प्रदान केले.
या चर्चासत्रात श्री. किशोर शाह यांनी मॉडरेटरची भूमिका बजावली. या पॅनेलमध्ये इनोव्हेंटचे संस्थापक श्री. अखिलेश भिसो, बोनवीचे संस्थापक आणि सीईओ श्री. तनय राताबोली आणि विष्कार मॉडर्नायझिंग कन्स्ट्रक्शनचे संस्थापक आणि सीईओ श्री नीरज डी. नाईक यांचा समावेश होता. या संस्थापकांनी त्यांच्या स्टार्टअप संघर्षांबद्दल सांगून, त्यांच्या व्यवसायांना पुढे नेण्यात मदत करण्यासाठी तज्ञांकडून अनुकूल उपाय संपादित केले.
या कार्यक्रमाने गोव्याच्या वाढत्या स्टार्टअप इकोसिस्टममधील कामगिरीवरही प्रकाश टाकला. बोनवी चे संस्थापक श्री. तनय राताबोली यांनी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या (जीएमसी) नैतिकता समितीकडून, रेडिओलॉजी विभागामार्फत माहिती संकलनाचा प्रस्ताव सादर करण्यास मान्यता मिळवून एक महत्त्वाचा टप्पा गाठला. त्याच्या एआय-सक्षम डायग्नोस्टिक प्लॅटफॉर्मला पुढे नेण्यासाठी आवश्यक असलेला सर्वसमावेशक डेटासेट तयार करण्यासाठी, ही मान्यता महत्त्वाची आहे.
इनोव्हेंटचे संस्थापक श्री. अखिलेश भिसो, हे २१ दिव्यांग क्षेत्रांना एकत्र करणारे परस्परसंवादी माध्यम तयार करताना रिअल इस्टेट क्षेत्रात, व्हर्च्युअल रिॲलिटीच्या एकत्रीकरणासाठी पुढाकार घेत आहेत. हल्ली, इनोव्हेंटने स्थापत्य आणि बांधकाम यांवर प्रारंभिक लक्ष केंद्रित करून, दिव्यांग व्यक्तींसाठी मॉड्युलर रिॲलिटी एक प्रवेशयोग्य व्यासपीठ बनविण्याचा शोध लावला आहे. अधिकृत प्लॅटफॉर्मद्वारे प्रवेशयोग्य आभासी वातावरण टिपणारी उत्पादन-आधारित सेवा विकसित करणे, ही त्यांची दृष्टी आहे. मात्र, दिव्यांगत्वाच्या जागेच्या विस्तृत व्याप्तीसह, अखिलेश यांच्यासमोर प्रत्येक क्षेत्रातील विविध गरजा पूर्ण करण्याचे मोठे आव्हान आहे. तज्ञांनी त्याना अधिक टिकाऊ व्यवसाय मॉडेल विकसित करण्यासाठी, विशिष्ट दिव्यांगत्व क्षेत्रांना लक्ष्य करून, सुरुवातीला आपले ध्यान काही मोजक्या गोष्टींवर ठेवण्याचा सल्ला दिला आहे. स्वतः च्या असेट, आकांक्षा आणि बाजारातील वास्तवांचे विश्लेषण करून, अखिलेश आपली ताकद विशिष्ट क्षेत्रातील मागणी आणि पुरवठा यांच्याशी धोरणात्मकपणे संरेखित करू शकतात. याव्यतिरिक्त, व्यवसाय तज्ञ आणि मार्गदर्शकांसह त्याचे नेटवर्क मजबूत केल्याने, त्याना आपला दृष्टिकोन सुधारण्यास मदत होईल. मुख्य क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून, सर्वसमावेशकता आणि नाविन्यपूर्णतेसाठी अखिलेश यांच्या उत्कटतेला खरे राहून इनोव्हेंट कायमस्वरूपी प्रभाव पाडू शकते.
विष्कार मॉडर्नायझिंग कन्स्ट्रक्शनचे संस्थापक आणि सीईओ, श्री. नीरज डी. नाईक, हे एका नाविन्यपूर्ण ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे बांधकाम साहित्य खरेदी करण्याच्या पद्धतीत क्रांती आणत आहेत, जे ग्राहक आणि विकासकांना एकाच स्त्रोताकडून सामग्रीची तुलना आणि खरेदी करण्यास मदत करतात. पुरवठा साखळी पूर्णपणे प्रस्थापित असताना, श्री. नीरज त्यांची पोहोच वाढवण्यासाठी आणि मोठ्या विकासकांना व्यासपीठावर आकर्षित करण्यासाठी प्रयत्नरत आहेत. या उद्दिष्टाचे समर्थन करण्यासाठी, तज्ञांनी त्याना जैवविविधतेला प्रोत्साहन देणे आणि पावसाच्या पाण्याचे संचयनाचे उपाय समाविष्ट करणे यासारख्या टिकाऊपणाच्या वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकून, अद्वितीय विक्री प्रस्तावाला बळकट करण्याचा सल्ला दिला आहे, जे दोन्ही बांधकाम उद्योगात महत्त्वपूर्ण आहेत. याव्यतिरिक्त, त्यांनी मोठ्या विकासकांसोबत विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी बांधकाम पुरवठा लॉबीमध्ये सामील होण्याची आणि स्थापित उद्योगातील लोकांसोबत भागीदारी करण्याची शिफारस केली. श्री. नीरज यांनी कंपन्यांना मोफत व्हीआर प्रशिक्षण आणि कार्यशाळा देऊन सक्रिय पावले उचलली आहेत. याद्वारे त्यांनी त्यांचे माध्यम, कार्यक्षमता कशी वाढवू शकते आणि साहित्य खरेदी कशी सुलभ करू शकते, हे दाखवून दिले आहे. आपली रणनीती सुधारून आणि महत्त्वाच्या आघाड्या तयार करून, ते मोठ्या डेव्हलपर्सचे आकर्षण मिळवण्याच्या दृष्टीने विष्करला ते स्थान देत आहे.
बोनवी चे संस्थापक आणि सीईओ श्री. तनय राताबोली, क्ष-किरणांचे विश्लेषण करण्यासाठी डिझाइन केलेले एआय-शक्तीवर चालणारे साधन, प्रवर्तित करत आहेत, ज्यामुळे ऑर्थोपेडिक डॉक्टर आणि रेडिओलॉजिस्टना हाडांच्या समस्या अधिक कार्यक्षमतेने शोधण्यात मदत होते. काही रेडिओलॉजिस्ट डेटा सामायिक करण्याबाबत सावध असल्याने, ते त्यांच्या एआय साठी डेटासेट मिळवण्यातील आव्हानांना सामोरे जात आहेत. मात्र, आरोग्य मंत्रालयाकडून मंजूरी मिळवणे हे वैद्यकीय समुदायातील संबंध मजबूत करण्याची संधी देते. या आव्हानांना तोंड देण्यासाठी, तज्ञांनी श्री. तनय यांना मंत्रालयाकडून अधिकृत मान्यता मिळविण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला, ज्यामुळे वैद्यकीय समुदायामध्ये विश्वास वाढेल. त्यांनी अधिक व्यापक एआय सोल्यूशन विकसित करण्यासाठी दिव्यांग आणि महिलांचे आरोग्य यासारख्या, आरोग्य क्षेत्रांवरील सर्वांगीण माहिती गोळा करून दृष्टीकोन विस्तृत करण्याची शिफारस केली. या धोरणामुळे नवीन भागीदारी होऊ शकते आणि त्यांच्या बाजारपेठेची क्षमता वाढू शकते.
कार्यक्रमादरम्यान, प्रत्येक संस्थापकांना त्यांच्या व्यावसायिक आव्हानांना तोंड देण्यासाठी मार्गदर्शकांचा संपर्क आणि संदर्भ प्रदान करण्यात आला. ‘फ्लिप द क्लासरूम’ हा उपक्रम उद्योजकीय आव्हानांना तोंड देण्यासाठी सहकार्याची अफाट शक्ती प्रदर्शित करते. हा उपक्रम संस्थापकांना त्यांच्या व्यवसाय मॉडेल्सवर पुनर्विचार करण्यासाठी, त्यांचे नेटवर्क विस्तृत करण्यासाठी आणि त्यांचे मूल्य प्रस्ताव परिष्कृत करण्यासाठी साधनांसह सुसज्ज करतो. स्वत: ची शंका, ग्राहक प्रतिबद्धता आणि त्यांच्या स्टार्टअप्सचे ओझे यासारख्या मूलभूत संघर्षांना तोंड देऊन, संस्थापकांना त्यांच्या मूळ प्रेरणा आणि आवडींशी पुन्हा जोडण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.
ही चिंतनशील प्रक्रिया त्यांना तांत्रिक आणि आंतर वैयक्तिक दोन्ही कौशल्ये वाढवण्यास मदत करते व त्यांची उद्दिष्टे बाजारातील वास्तविक मागणीनुसार संरेखित करते. अंततः ‘फ्लिप द क्लासरूम’ सारखे उपक्रम केवळ वैयक्तिक संस्थापकांनाच सशक्त करत नाहीत, तर संपूर्ण स्टार्टअप इकोसिस्टम मजबूत बनवते.