Connect with us

गोवा खबर

राज्यपालांकडून ईद-ई-मिलादच्या शुभेच्छा

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोव्याचे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांनी गोव्यातील लोकांना आणि विशेषत: मुस्लिम बंधु, भगिनीना महम्मद पैगंबराच्या जन्मदिनी साजरा करण्यात येणाऱ्या ईद-ई-मिलादच्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. 

आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, पैगंबर महम्मद हे सद्गुण, सत्य आणि निःस्वार्थ सेवेचे प्रतिक आहेत ज्यांनी शांतता, बंधुत्व आणि दया अशा आदर्श मुल्यांची शिकवण दिली. आज आपल्या जीवनात या मुल्यांना खूप महत्त्व आहे. आनंदी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी पैगंबर महम्मद यांच्या चिरंतन शिकवणीचे आपण आचरण केले पाहिजे.

ईद-ई-मिलाद किंवा मिलाद-उन-नबीच्या या आनंदाच्या प्रसंगी आपण सर्वांनी पैगंबर महम्मद यांनी उपदेश केलेल्या आदर्श विचारांच्या प्रचारासाठी स्वतःला समर्पित करूया आणि समाजाच्या भरभराटीसाठी आणि देशात शांतता आणि सलोखा वाढीस लावण्यासाठी काम करूया.

हा शुभ प्रसंग प्रत्येकांच्या जीवनात अधिक शांतता आणि आनंद घेऊन येवो, असे राज्यपाल आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.