Connect with us

गोवा खबर

#CashforJob घोटाळ्याची कारवाई करण्याची मागणी

Published

on

Spread the love

गोवा खबर : दक्षिण गोवा कलेक्टर कार्यालयातील कथित घोटाळ्याचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी न्याय आयोगाची नियुक्ती करावी, अशी मागणी गोवा काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेस कार्यकारी समितीचे सदस्य गिरीश चोडणकर यांनी केली आहे.

मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या भरती प्रक्रियेमध्ये गैरसंबंध नसल्याच्या दाव्यावर चोडणकर यांनी शंका उपस्थित केली. टीसीपी मंत्री म्हणून त्यांच्या कालावधीत त्यांनी बिल्डर लॉबीच्या हितसंबंधांना प्राधान्य दिले होते. त्यांच्या पदाचे महत्त्व संपले आहे. त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी चोडणकर यांनी केली.