भारत-संयुक्त अरब अमिराती संबंध मजबूत करण्यासाठी दोन्ही नेत्यांनी केली चर्चा
गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत अबुधाबीचे युवराज शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांचे स्वागत केले. उभय नेत्यांमध्ये विविध विषयांवर फलदायी चर्चा झाली.
भारत-यूएई मैत्री वृध्दिंगत करण्यासाठी युवराज शेख खालिद यांनी दाखवलेल्या उत्कटतेचे पंतप्रधान मोदींनी कौतुक केले.
पंतप्रधानांनी समाज माध्यम ‘एक्स’वर पोस्ट केले; “अबू धाबीचे युवराज शेख खालेद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांचे स्वागत करताना आनंद झाला. आमची विविध विषयांवर फलदायी चर्चा झाली. भारत-यूएई मैत्री मजबूत व्हावी याविषयी त्यांना असलेली तळमळ स्पष्टपणे दिसून येते.”