गोवा खबर : एमपॉक्स (मंकीपॉक्स) संशयित मानलेल्या रुग्णाला प्रवासाशी संबंधित संसर्ग म्हणून सत्यापित केले आहे. प्रयोगशाळेतल्या चाचणीने रुग्णामध्ये पश्चिम आफ्रिकन क्लेड 2 चा एमपॉक्स विषाणू आढळल्याची पुष्टी केली आहे.
हे प्रकरण वेगळे असून जुलै 2022 नंतर भारतात नोंद झालेल्या 30 प्रकरणांप्रमाणेच आहे आणि सध्याच्या सार्वजनिक आरोग्य आणीबाणीचा (जागतिक आरोग्य संघटनेने म्हटल्याप्रमाणे) भाग नाही ,जो एमपॉक्सच्या क्लेड 1 शी निगडित आहे.
हा रुग्ण एक तरुण पुरुष असून तो अलिकडेच एमपॉक्स चा प्रादुर्भाव असलेल्या देशातून आला आहे आणि सध्या त्याला विलगीकरण सुविधेत ठेवले आहे. रुग्ण वैद्यकीयदृष्ट्या स्थिर असून त्याला कोणताही अन्य आजार नाही.
हे प्रकरण पूर्वी केलेल्या जोखीम मूल्यांकनाशी अनुरूप आहे आणि स्थापित नियमांनुसार उपचार सुरु आहेत. परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी संपर्कात आलेल्यांचा शोध आणि देखरेख यासह सार्वजनिक आरोग्य उपाय सक्रियपणे केले जात आहेत. सध्या तरी जनतेसाठी गंभीर धोका दिसत नाही.