Connect with us

गोवा खबर

डॉ. माधवी सरदेसाई युवा शिक्षक पुरस्कारासाठी आवाहन 

Published

on

Spread the love
गोवा खबर : गोव्यातील प्रसिद्ध भाषातज्ञ, विद्यार्थीप्रिय प्राध्यापिका आणि साहित्य अकादेमी पुरस्कारप्राप्त लेखिका डॉ. माधवी सरदेसाई यांच्या स्मरणार्थ देण्यात परिक्रमा नॉलेज टर्मिनसच्यावतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या युवा शिक्षक पुरस्कारासाठी आवाहन करण्यात आले आहे. पंचवीस हजार रुपये रोख, मानपत्र, मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 
सदर पुरस्कारासाठीच्या अर्जदाराचे वय ४० पर्यंत असावे, मात्र गरज पडल्यास निवड समिती वयाची शिथिल करेल. सदर अर्जदार कोणत्याही विषयाचा शिक्षक असू शकतो, त्याचप्रमाणे नियमित शिक्षकांसमवेतच तासिकावार, तसेच कंत्राट पद्धतीचे शिक्षक देखील या पुरस्कारासाठी आपले नामांकन पाठवू शकतात. सदर शिक्षकाचे विद्यार्थी चळवळ तसेच परिक्रमा नॉलेज टर्मिनसमधील योगदानाचे यावेळी विशेष दखल घेतली जाणार असून, १५ जानेवारो २०२५ पर्यंत सदर अर्ज विहित नमुन्यात पाठवून देण्याचे आवाहन केले आहे.
परिक्रमा 0.7 च्या ‘झिरो फेस्ट’च्या उद्घाटन सोहळ्यामध्ये, म्हणजेच १ फेब्रुवारी २०२५ रोजी सदर पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी निखिल साळगांवकर यांच्याकडे ८८०५५०६६०७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.