Connect with us

गोवा खबर

गोव्यात यंदा ३ लाख १६ हजार झाडांची लागवड : विश्वजित राणे

Published

on

Spread the love
गोवा खबर : पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने गोव्याने उल्लेखानीय उदाहरण ठेवत राज्यात ४५० हॅक्टर जमिनीत तब्बल ३.१६ लाख झाडे लावली आहेत, अशी माहिती वनमंत्री विश्वजित राणे यांनी दिली. निसर्ग संवर्धनाचे काम गोवा असेच पुढे नेणार आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
झाडे लावण्याबाबत केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने राज्याला जे लक्ष्य दिले होते, त्याच्याही पुढे जावून राज्याने काम केले आहे. राज्यातील विविध भागांतील ४५० हॅक्टर जमिनीत तब्बल ३.१६ लाख झाडे लावण्यात आली आहेत. लोकप्रतिनिधी, शाळा, एनजीओ तसेच नागरिकांच्या मदतीने हे सर्व शक्य झाल्याचेही मंत्री राणे यांनी नमूद केले.
ते म्हणाले, की शाश्वत भविष्य, हरित गोवा हे ध्येय समोर ठेवून ही झाडांची लागवड केली जात आहे. २०२१ च्या वन अहवालानुसार राज्यातील वन क्षेत्र हे २२४४.
भारतीय वन सर्व्हेक्षणाने जारी केलेल्या २०२१ सालच्या भारतीय वन अहवालानुसार गोव्यातील २७ चौरस किलोमीटर जमीन ही खारफुटीखाली आहे. २०१९ सालाच्या तुलनेत खारफुटीखालील जमिनीत १ चौरस किलोमीटरने वाढ झाल्याची नोंद असल्याचे या अहवालात नमूद केले आहे. राज्य सरकार राज्यातील वन क्षेत्राचे संवर्धन, संरक्षण करण्याबाबत कटिबद्ध असून त्यादिशेने ठोस पावले उचलत असल्याचेही वनमंत्री राणे यांनी स्पष्ट केले.
२१ चौरस किलोमीटर इतके आहे. राज्यातील वन क्षेत्रात मागील पाच वर्षात मोठी वाढ झाली आहे. राज्य वन अहवालानुसार १२२५.१२ चौरस किलोमीटर सरकारी वन क्षेत्र तर खासगी वन क्षेत्र हे ५०.६६ चौरस किलोमीटर इतके असल्याचे त्यांनी नमूद केले.